जीवनदीप महाविद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

दिव्येश जाधव, खर्डी
Sunday, 8 March 2020

खर्डी - कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खर्डी येथे आज दि. ८ मार्च २०२० रोजी महिला विकास मंच विभागाने जागतिक महिला दिन साजरा केला.

महाविद्यालयाचे प्राचार्य के. आर. कळकटे यांनी आद्य महिला शिक्षिका सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्राचार्य कळकटे सर यांनी महिलांच्या यशामागे प्रत्येक पुरुषाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे आवाहन केले. 

प्रा.सोनाली भवर मॅडम यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले. राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि आताच्या काळातील प्रतिभाताई पाटील, किरण बेदी यांसारख्या यशस्वी महिलांची उदाहरणे आपल्या समोर आहेत की त्यांनी राजकारण, समाजकारण, प्रशासन क्षेत्रात उत्तुंग अशी भरारी घेतली आहे.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन प्रा.भूषण विशे सर यांनी मुलींना स्वयंसिद्धाचे धडे दिले. तसेच विद्यार्थीनींकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देखील करून घेतले. या कार्यक्रमासाठी मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रा. पालवे मॅडम, प्रा. शिंदे मॅडम, प्रा. कंठे मॅडम, प्रा. रुपाली घोडविंदे या महिला प्राध्यापिका या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रेश्मा घोडविंदे यांनी केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News