तिसरे जागतिक महायुध्द -COVID 19

मनिषा टकले
Friday, 22 May 2020

 "कोरोणाची लागण झाली म्हणजे , लगेच माणूस दगावतोच असा गैरसमज काढून टाका." कोरोनाची लागन झालेले कित्येक पेशंट बरे होऊन घरी परतलेले आहेत.पण आपण आता आपण कोरोनाची लक्षणं काय आहेत तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय खबरदारी घ्यावी हे जाणून घेणार आहोत.

Third world war against the corona(covid 19)
तिसरे जागतिक महायुध्द  होय युद्धच.... कोरोना विरुद्ध...आज संपूर्ण जगभरात जागतिक आरोग्य हा खूप मोठा गहन व चिंताजनक प्रश्न निर्माण झाला आहे.जगभरात सर्वत्र कोरोनाने थैमान घालून दहशतीचे व तणावाचे वातावरण निर्माण केले आहे ,आणि या  युद्धातील खरे योध्ये म्हणजे डॉक्टर्स, परिचारिका,पोलिस यंत्रणा व सरकारी कर्मचारी आहेत.त्यांच्या कार्याला खरच सलाम.
     
सध्या आपण वर्तमानपत्र, न्यूज चॅनल्स, व्हॉटसअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियाद्वारे त्याचप्रमाणे घराघरांतून प्रत्येकाच्या तोंडून एकच विषय ऐकत आहोत, एकच चर्चा होताना दिसते ती म्हणजे दहशतवादी कोरोणा विषाणू बद्दल. कोरोना व्हायरस म्हणजेच covid 19 या विषानुने सर्व जगभरात धुमाकूळ घातला आहे व जगात तणावाचे वातावरण निर्माण केले आहे.सर्वांच्या मनात कोरोनाची भीती व धास्ती निर्माण झाली आहे. कोरोनाला महामारी म्हणून घोषीत केले आहे.

या विषानुला जात - पात ,धर्म - प्रांत,गरीब - श्रीमंत असा काही भेदभाव माहित नाही. हॉलिवूड कलाकार, खेळाडू,मंत्री,उद्योजक व सर्वसामान्य नागरिक तसेच लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना वेठीस धरले आहे. इतिहासात कधीही न झालेले निर्णय आता घेण्यात येत आहेत. उदाहरणार्थ :- देऊळ बंदचा निर्णय.त्याचप्रमाणे सर्वत्र यात्रा,  उरूस, क्रिकेट मॅच रद्द करण्यात आल्या आहेत.
       " युद्धाकारण पृथ्वी वरती | विषवायू पसरेल ||
        असंख्य जीव ते विषवायूने |प्राणासी मुकतील||
        युद्धकारणे पृथ्वीवरती |प्रदूषण फैलावेल||
        अनेक दशके या परिणामे | मानव त्रसवेल||
        रोगी - खुजी निकृष्ट अशी | प्रजोत्पत्ती होईल ||
        पृथ्वीवरचे व्यवहार सारे | पहा बंद पडतील||"
या आहेत संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या.याप्रमाणेच परिस्थिती निर्माण झाली आहे.ज्ञानेश्वरांनी ७०० वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी या ग्रंथात या ओव्या लिहून ठेवल्या आहेत. या ओव्यांमध्ये केलेलं भाकीत म्हणजेच भविष्यवानी खरी होणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे पण  म्हणतात ना "प्रयत्नांती परमेश्वर." असे म्हणून न घाबरता जबाबदार,सजग आणि जागरूक नागरिक होऊन सुजाण नागरिकांची कर्तव्य पार पाडली पाहिजे.आपण कोरोना या विषाणूवर मात करू शकतो.पण त्यासाठी काही खबरदारीचे नियम सर्वांनी पाळायला हवे.आपले आरोग्यमंत्रालय सुद्धा युद्धपातळीवर कार्यरत आहे.सरकारनी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी वेळोवेळी पालन करावे.
     "कोरोणाची लागण झाली म्हणजे , लगेच माणूस दगावतोच असा गैरसमज काढून टाका." कोरोनाची लागन झालेले कित्येक पेशंट बरे होऊन घरी परतलेले आहेत.पण आपण आता आपण कोरोनाची लक्षणं काय आहेत तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय खबरदारी घ्यावी हे जाणून घेणार आहोत.

कोरोनाची लक्षणे:-

१) १-३ दिवस :- ताप भरणे , किरकोळ घसादुखी.
२)४था दिवस:- घासा दुखणे /खवखवणे, आवाज बदलणे,शरीराच्या तापमानात वाढ,तीव्र डोकेदुखी, डायरिया.
३)५ वा दिवस:- थकवा जाणवणे, स्नायू दुखी ,कोरडा खोकला.
४)६ वा दिवस :- ताप ३७°से. पर्यंत, उत्पादनक्षम खोकला,किंवा कोरडा खोकला, श्वासोच्छ्वासात अडचण, डायरिया  आणि उलट्या.
५)७ वा दिवस :- तीव्र ताप ३७;३८°से, शरीर जखडणे,खोकला किंवा थुंकीचे प्रमाण वाढणे, तीव्र वेदना , उलट्या ,जुलाब.
६)८-९ दिवस:- तीव्र लक्षणे प्रचंड ताप, असहनिय खोकला, श्वास घेणे कठीण होते.
     अशा स्थितीत वैद्यकीय तपासणी अवश्य करावी आणि आपण covid 19 ने आहोत का हे तपासावे.

पण घ्यावयाची खबरदारी:- 

१) मास्क वापरा - पण कधी - बाहेर जाताना, कोरोनाबधित व्यक्तीची काळजी घेत असाल तर, खोकला ,शिंक येत असेल तर मास्क जरूर वापरा.पण तुम्हाला तो मास्क कसा वापरायचा आणि कसा नष्ट करायचा हे माहीत पाहिजे.ते मास्क योग्य पद्धतीने नष्ट करावे.
२)सतत थोड्या थोड्या वेळाने हात सॅनिटायझरने /डेटॉल/साबणाने स्वच्छ २५-३० सेकंद चोळून धुवावे.
३) शिळे किंवा थंड अन्न , आईस्क्रीम सारखे पदार्थ खाणे टाळावे. रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त फळांचे सेवन करावे. उदाहरणार्थ:- लिंबूवर्गीय फळांचे सेवन करावे, संत्री आवळा, मोसंबी यासारखी ..
४)गरम पाणी प्यावे. आणि गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्यात म्हणजे हे विषाणू घशात नष्ट होतात.
५) बाहेरून आल्यावर स्वच्छ साबणाने हातपाय धुवा.
६)शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.(घरामध्येच रहाणे उत्तम.)
७)हस्तांदोलन, आलिंगन या गोष्टी टाळा व भारतीय जीवनशैलीचा वापर करा.हात जोडून लांबूनच नमस्कार करा.
८)रस्त्यावर थुंकू नये, आपले डोळे नाक , तोंड यांना वारंवार /सारखे हात लावू नये.
९)मानसिक आरोग्य उत्तम रहाण्यासाठी मेडिटेशन करावे. रोगप्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी योगासने व सूर्यनमस्कार करावेत.
१०)खोकताना , शिंकताना रुमाल किंवा टिश्यू चा वापर करावा.
११) हात धुताना "SUMAN  M"  ya पद्धतीचा वापर करावा.mhanjech- s- सरळ, u- उलटे,m- मूठ, a- अंगठा, n- नखे, m-मनगट इ.स्वच्छ २५-३० सेकंद चोळून धुवावे.
१२)घरातील वृद्ध व १० वर्षाच्या आतील लहान मुलांची काळजी घ्या. शक्यतो त्यांना बाहेर पडू देऊ नका. अशा प्रकारे आपणही कोरोनापासून दूर राहूया आणि इतर कोणालाही होणार नाही याची खबरदारी घेऊया.

कोरोना व्हायरसमुळे झालेले परिणाम :-

सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे.कधीही न घेतलेले निर्णय घ्यावे लागत आहेत.जसे की देऊळ बंद चा निर्णय. शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आली.परीक्षा रद्द करण्यात आल्या.शेअर्स चे बाजारभाव गडगडले,शहरात लॉकडाऊन ची परिस्थिती निर्माण झाली आहे. खाजगी कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम चे आदेश देण्यात आले आहेत. सिनेमागृह ,  नाट्यगृह, जलतरणतलाव  अशी गजबजलेली ठिकाण ओस पडलेली दिसत आहेत.प्रचंड वर्दळीचे रस्ते  ओस पडलेले दिसत आहेत.मानसिक तणाव वाढलेला असून कोरोनाचे सावट सर्वत्र पडलेले दिसत आहे. कोरोनाकडे कोणताही भेदभाव नाही संपर्कात येईल त्याला लागण. कोरोनाने सर्वांना वेठीस धरले आहे.
      
हे संकट महाराष्ट्रावर अधिक तीव्र आहे .आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे साहेब व आरोग्यमंत्री  माननीय नामदार राजेश टोपे साहेब राज्यावर आलेले संकट अतिशय जबाबदारीने परतावून लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे म्हणून त्यांचे मनापासून आभार. माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेबांची आई अतिदक्षता विभागात असून सुद्धा ते रात्रंदिवस मेहनत घेत आहेत, त्यांनी फक्त आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रालाच आपले कुटुंब मानले व त्या दृष्टीने ते मेहनत घेत आहेत व मेहनतीला यश मिळावे म्हणून ते प्रत्नांची पराकाष्ठा करत आहेत.परंतु हे काम फक्त मंत्री महोदयांचे नसून आपल्या सर्वांचे आहे.
     
आपले पंतप्रधान मोदींनी येत्या रविवारी म्हणजेच २२ मार्च ला जनता कर्फ्यू चे आयोजन केले आहे.पण मी तर म्हणेल आपण २२ मार्च ची वाट न पहाता आज आत्तापासूनच जनता कर्फ्यू चे नियम पाळुया.सर्वांना आव्हान करते की सर्वांनी जनता कर्फ्यू मध्ये सहभागी  होऊन , सर्व नियम पाळून जबाबदार, जागरूक नागरिक बनुया व जनता कर्फ्यूचा हेतू यशस्वी  होण्यासाठी मदत करूया. हा जनतेने जनतेसाठी लावलेला कर्फ्यु आहे.त्या दिवशी सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत घराबाहेर पडायचे नाही.वरिष्ठ नागरिकांनी , ६० वर्षांवरील नागरिकांनी व लहान मुलांनी घरातच थांबावे.येत्या रविवारी म्हणजेच २२ मार्चला संध्याकाळी ५ वाजता सायरण वाजेल तेव्हा आपण दारात खिडकीत , बाल्कनीत उभे राहून सरकारी कर्मचाऱ्यांचे आभार मनुया,टाळ्या वाजवून , घंटी वाजवून आभार मानूया.... या मागेपण योगशास्त्र आहे सर्वांनी मदतीचा हात द्या.आपण सर्वजण मिळून कोरोणावर मात करू शकतो.

" मरण दुसऱ्याच आहे, तोपर्यंत गांभीर्य लक्षात येत नाही,तेव्हा आपण जोक करून हसतो, पण जेव्हा ते आपल्या आसपास असल्याची चाहूल जरी लागली तरी भीती वाटते." म्हणूनच सर्वांना कळकळीची विनंती आहे, योग्य ती खबरदारी घ्या आणि तिसऱ्या आठवड्याची साखळी तोडण्यास मदत करा.जर आपण तिसऱ्या आठवड्याची साखळी तोडण्यात यशस्वी ठरलो तर आणि तरच आपण यशस्वी नाहीतर आपल्यावर कोरोना नावाचे खूप मोठे महाभयंकर संकट ओढवणार आहे.म्हणूनच आपण शाळा कॉलेजला सुट्ट्या आहेत  त्या ब्रेक म्हणून नाही, कुठेही फिरायला जाऊ नका, आपल्याला काही होणार नाही असे म्हणू नका गांभीर्य लक्षात घ्या.लग्न, पार्ट्या, वाढदिवस, असे जमावाचे कार्यक्रम काही दिवस थांबवा,योग्य ती खबरदारी घ्यावी स्वत: बरोबर इतरांच्याही आरोग्याची काळजी घ्या.आपले डॉक्टर्स आणि परिचारिका आणि पोलिस यंत्रणा व इतर सरकारी कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता युद्धपातळीवर काम करत आहेत त्यांच्या कार्यात आपण जागरूकतेने वागून मदत करूया.जमाव टाळा, आता तर शासनाने जमावबंदी साठी कलम १४४ चा वापर  सुरू केला आहे. आपण सोशल मीडियावर अपडेट राहून मेसेजेस करून जनजागृती कराच पण स्वत: एक जबाबदार व जागरूक नागरिक बना, तरच आपले ध्येय साध्य होईल व कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणुवर सुद्धा मात करू शकू.फक्त गांभीर्य लक्षात घ्या , सहकार्य करा व मदतीचा हात द्या.
      
 घाबरु नका पण जागरूक रहा. कोरोना विषाणू पासून आपला बचाव करा.(
अधिक माहितीसाठी संपर्क साधा:- 
१)राष्ट्रीय कॉल सेंटर नं:- +91-11-23978046
२)राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्र:- 020- 26127394
३)टोल फ्री  हेल्पलाईन क्रमांक:- 104
(देशाचा नागरिक असून आपल्याकडून जनजागृतीसाठी  छोटीशी मदत म्हणून  केलेला छोटासा प्रयत्न.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News