विश्वकरंडक ट्‌वेंटी 20 स्पेर्धेचे आयोजन लांबणीवर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 29 May 2020

ऑस्ट्रेलिया सरकारही पंधरा परदेशी संघांना सध्या देशात प्रवेश देण्यास तयार नसल्याचीही चर्चा आहे.

मुंबई : विश्वकरंडक ट्‌वेंटी 20 क्रिकेट स्पर्धेच्या संयोजनाबाबतचा अंतिम निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुन्हा लांबणीवर टाकला. स्पर्धा संयोजनाबाबत निर्णय घेण्यासाठी झालेल्या बैठकीत यंदाच्या तसेच भारतात पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेबाबत एकमत होऊ शकले नाही आणि अखेर याबाबतचा निर्णय 10 जूनपर्यंत लांबणीवर टाकण्याचे ठरले.

विश्वकरंडक स्पर्धा प्रेक्षकांविना घेण्याचे ऑस्ट्रेलियाला सध्या आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. तसेच या स्पर्धेपूर्वी पंधरा दिवस विलगीकरण करण्याचे ठरले, तर त्याचा खर्च कोणी करायचा, हा प्रश्नही होताच. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया सरकारही पंधरा परदेशी संघांना सध्या देशात प्रवेश देण्यास तयार नसल्याचीही चर्चा आहे. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाने विश्वकरंडक ट्‌वेंटी 20 स्पर्धेबाबत निर्णय होण्याच्या दिवशी आपला देशांतर्गत कार्यक्रम जाहीर केला आणि त्यात स्पर्धेसाठी कालावधीच ठेवला नसल्यामुळे अनेक देश नाराज होते, असेही सांगितले जात आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News