जागतिक ताणतनाव दिन : ताणतनावाला दूर करूया, सुखी जीवन अंगिकारूया

विशाख कऱ्हाळे
Wednesday, 13 May 2020

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार मानसिक तणावाच्या बाबतीत भारत हा पहिल्या १५ देशांच्या यादीत आहे. भारतात दर ५ लोकांमागे एक व्यक्ती ही तणावग्रस्त आहे म्हणजेच २० टक्के लोकसंख्या ही तणावाखाली जगत आहे.

'अपेक्षा' आणि 'आशा' हे दोन शब्द भलेही बाराखडीच्या पहिल्या दोन मुळाक्षरापासून बनलेले असले तरी या दोन्ही शब्दांना संमिश्र भावनेची किनार आहे. आशा आणि अपेक्षा पूर्ण झाल्यावर व्यक्ती जितकी आनंदित होते, तितकीच किंबहुना त्यापेक्षा अधिक दुःखी पूर्ण न झाल्यावर होते. आणि बहुधा तानतनाव येथूनच सुरू होत असावा. मग आता यासाठी आशा आणि अपेक्षा ठेवूचं नये. ही तितकंस सोप नाही. कारण 'उम्मीदों पे दुनीया कायम है' किंवा सकारात्मक विचार करा हे जेंव्हा आपण म्हणतो तेंव्हाच आपण आशा आणि अपेक्षेला खतपाणी घालत असतो. 

सध्याच्या २१ व्या शतकात स्पर्धा जितकी तीव्र झाली, तितकेच समाधान मानायच्या मानवी कक्षा रूंदावल्या. पुर्वी ७० टक्के मिळाल्यावर अख्खा गाव आनंदी व्हायचा. आता ९९ टक्के मिळवणारा स्वतः तरी खूश असतो का? असा प्रश्न पडतो कारण ही स्पर्धा इतकी तीव्र आहे की या स्पर्धेने असमाधानी रहाण्याचा एक अलिखीत नियमच घालून दिलाय. आज नवनवीन तंत्रज्ञान वापरून जगण्याच्या वाटा आणखी सुसज्ज होत असतीलही परंतु, यासोबत माणूस माणसासोबतचा संवाद विसरत चाललाय. कारण सोशल मीडियाच्या आहारी गेलेला हा माणूस आज ऑनलाइन गप्पा मारण्यात धन्यता मानतो. परंतु, ऑनलाईन चँट करताना मनातील भावना ओठावर आणि ओठातील भावना बोटावर येईलच असे नाही. मग मनात संशयकल्लोळ निर्माण होऊन तणावास खतपाणी मिळते. थोडक्यातच काय ऑनलाइन जगात माणसे मात्र ऑफलाईन माणसे होत आहेत हे मात्र नक्की.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार मानसिक तणावाच्या बाबतीत भारत हा पहिल्या १५ देशांच्या यादीत आहे. भारतात दर ५ लोकांमागे एक व्यक्ती ही तणावग्रस्त आहे म्हणजेच २० टक्के लोकसंख्या ही तणावाखाली जगत आहे. यात कॉर्पोरेट क्षेत्र आघाडीवर आहे. यातूनच व्यसनाच्या आहारी जाण्याचे मार्ग अवलंबले जातात आणि या जीवनशैलीला हे लोक काळाजी गरज मानतात. 

तरुणांचा देश अशी ओळख असणाऱ्या या देशात व्यसनाच्या आहारी जाणारे लोक हे मुख्यत्वे ऐन विशितले आणि तिशीतले असल्याने हे एक भयानक वास्तव आज आपल्यासमोर उभे आहे. जगातल्या आनंदी देशाच्या यादीत भारताचे १११ वे स्थान आपल्याला खऱ्या अर्थाने दुःखी करते. खानपाणाच्या बदललेल्या सवयी, बदलेली जीवनशैली, मर्यादेच्या पलिकडील कामाचे तास यांचा एकत्रित परिणाम आरोग्यावर होतच असतो. आज कोरोना सारखी महामारी जगावर विळखा घालून बसलेली असताना आज लोक खऱ्या अर्थाने अंतर्मुखी होत आहेत. कोरोनाच्या महामारीने आरोग्यम धनसंपदा हे सूत्र नव्याने अधोरेखित केले आहे. आज जग हे पैश्याच्या मागे न लागता सुखाच्या मागे लागतोय. येणाऱ्या काळात योग आणि ध्यानधारणा यांना प्राणवायू सारखे महत्व येईल यात शंका नाही. चला तर मग आजच्या या जागतिक ताण तनावदिनी एक संकल्प करूया धन कमावताना मन मात्र सशक्त करूया तनावाला दूर करूया सुखी जीवन अंगिकारूया.
                
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News