दुखणाऱ्या दातामुळे झाली चक्क वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद...!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020
  • डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्यानंतर हा दात काढून टाकण्याचा सल्ला या मुलाला दिला.

मध्य प्रदेश : अनेक वर्षांपासून दात दुखत असल्याने डॉक्टरकडे गेल्यावर चक्क वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याची घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. एका तरुणाच्या जबड्यातून डॉक्टरांनी चक्क ३९ मिमीचा दात काढला आहे. या तरुणाच्या दाताची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. 

गेल्या काही वर्षांपासून या तरुणाच्या दातामध्ये दुखणं सुरु होते. या दाताचे दुखणं घेऊन हा तरुण डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्यानंतर हा दात काढून टाकण्याचा सल्ला या मुलाला दिला. हा दात काढताना डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले, याचे कारण म्हणजे या मुलाच्या जबड्यातून ३९ मिमी लांबीचा दात बाहेर काढला. हा जगातील सर्वात लांब मानवी दात असल्याचा डाव डॉक्टरांनी केला आहे. 

या दातांची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात येणार आहे. या दातांची लांबी नोंदवली गेली आहे. यापूर्वी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ३७.३ मिली लांबीच्या दातांची नोंद झाली होती. मात्र या तरुणाच्या जबड्यातून काढण्यात आलेला दात हा ३९ मिमीचा आहे.

हा दात काढणाऱ्या डॉक्टरचे नाव डॉ. सौरभ श्रीवास्तव असे असून यापूर्वी जर्मनीचे डॉक्टर मॅक्स ल्यूक्सने सर्वात लांब दात काढण्याचा विक्रम केल्याची नोंद आहे. त्या दातांची लांबी ३७.२ मिमी होती. 

मध्यप्रदेशातील डॉ. सौरभ यांनी काढलेला दात ३९ मिमीचा असल्याने सर्वात जास्त लांबीचा मानवी दात म्हणून याची नोंद होणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News