जागतिक वारसा दिन: भारतातील 'ही' स्थळे पाहिलीत का?

स्वप्निल भालेराव
Thursday, 18 April 2019

आज 18 एप्रिल 'जागतिक वारसा दिन'. हा दिवस का साजरा केला जातो? भारतातील जतन करण्यात आलेल्या वारसा स्थळांची माहिती सांगणारा विशेष लेख...

इतिहास हा भविष्य घडवत असतो. देशाचा उज्जल इतिहास पुढील पिढीला कळावा व त्याचे संवर्धन व्हावे यासाठी 18 एप्रिला 'जागतिक वारसा दिवस' साजरा केला जातो. आपल्या देशातील जुन्या वास्तू, मंदिरे, चर्च, गुहा, स्मारके, किल्ले अशा अनेक संस्कृती आणि नैसर्गीक गोष्टी आहेत. त्या नष्ट होत आहोत. या पुरातन गोष्टी जतन केल्या पाहिजे.   

संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) त्यांच्याकडून 1982 मध्ये एक ठराव पास करण्यात आला. यावेळी आतिशय महत्वाचे
सांस्कृतिक आणि नैसर्गिक स्थळांची यादी तयार करण्यात आली केली. त्यांना जागतीक वारसा स्थळ ( World Heritage Day) म्हणून घोषित करण्याच आले.

सध्या जगात 1 हजार 34 स्थळे या वारसा यादीत आहेत. जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या इटली देशात आहे. ज्यात 51 वारसास्थळे आहेत. चीनमध्ये 48, स्पेनमध्ये 44 तर फ्रान्समध्ये 41 आहेत. भारत 36 वारसास्थळांसह साहाव्या  क्रमांकावर आहे.  मेक्सिको 33 व जर्मनी 40  स्थळांसह अनुक्रमे सातव्या व पाचव्या स्थानांवर आहेत. आशियात चीनमध्ये सर्वात जास्त स्थळे आहेत. सिंगापूरकडे फक्त सात स्थळे असूनही  आपल्यापेक्षा जास्त पर्यटक आकर्षित करतात.

1983 साली भारतातील दोन स्थळे सर्वप्रथम या यादीत समाविष्ट करण्याच आली. ती म्हणजे आग्र्याचा किल्ला आणि अजंठ्याच्या गुंफा. सध्या 36 भारतीय स्थळे त्या यादीत आहेत. त्यापैकी 28 सांस्कृतिक वारसा स्थळे आहेत तर, 7 निसर्ग आणी एक मिश्र स्वरुपच स्थळ आहे.

 • भारतातील वारसा स्थळ-
 • आग्रा किल्ला, आग्रा, उत्तर प्रदेश
 • फत्तेपूर सिक्री, उत्तर प्रदेश
 • ताज महाल, आग्रा, उत्तर प्रदेश
 • जुना गोवा
 • सांची स्तूप, मध्य प्रदेश
 • खजुराहोमधील प्राचीन मंदिरे, मध्य प्रदेश
 • भीमबेटका पाषाण आश्रय, मध्य प्रदेश
 • चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात
 • छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र
 • एलेफंटा लेणी/घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र
 • अजिंठा लेणी, महाराष्ट्र
 • वेरूळ लेणी, महाराष्ट्र
 • पश्चिम घाट, महाराष्ट्र
 • चोल राजांची मंदिरे, तमिळनाडू
 • महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडु
 • हंपीमधील मंदिरे, कर्नाटक
 •  पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक
 •  काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम
 •  मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम
 •  केवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान
 •  कोणार्क सूर्य मंदीर, कोणार्क, ओडिशा
 •  महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार
 •  भारतातील पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)
 •  नंदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान, उत्तरांचल
 •  कुतुब मिनार, दिल्ली
 •  लाल किल्ला, दिल्ली
 •  हुमायूनची कबर, दिल्ली
 •  सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News