दयानंद कला महाविद्यालयात जागतिक दिव्यांग दिन विविध उपक्रमाने साजरा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 December 2019

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दयानंद कला महाविद्यालयाच्या प्रागंणात संगीत स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती

लातूर: जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दयानंद कला महाविद्यालयाच्या प्रागंणात संगीत स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेत निलंगा येथील कै. गंगाबाई माधवराच बरुके निवासी अंध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे यांनी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांची ओळख करुन दिली.  प्राचार्य गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला व अल्पोहार दिला. 

अंध विद्यालयाचे शिक्षक पाटील एस. जी, जोशी सी. बी, बेलकोटे व्ही. एम, पिगांने डी. टी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर विद्यार्थी अक्षय खंडू जोगदंड, गणेश चंद्रकांत तोरे, सोनटक्के आमोल आशोक, विनीता आरुण भालेकर यांचे स्वागत परीक्षा विभाग प्रमुख डॉ. रमेश पारवे, डॉ. शिवाजी जवळगेकर, केंद्र सहसंचालक डॉ. एस. बी. आस्टुरे, डॉ. सुनिता सांगोले यांनी केले.

या प्रसंगी डॉ. रामेश्वर खंदारे, डॉ. सुनिल साळुके, कार्यालयीन अधिक्षक नवनाथ भालेराव, डॉ. संतोष पाटील, डॉ. सुभाष कदम, डॉ. मच्छिद्र खंडागळे, डॉ. जी. आर. लहाने, प्रा. महेश जंगापल्ले, प्रा. दिनेश जोशी, प्रा. राजकुमार मोरे, डॉ. अंजली जोशी उपस्थित होत्या .

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News