#WorldEmojiDay :  हा इमोजी भारतात सर्वाधिक वापरला जातो 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019

संवाद साधताना सर्वाधिक इमोजी वापरणाऱ्या युजर्समध्ये भारतीयांचा समावेशदेखील आहे. आजच्या घडीला  इमोजीचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. टेक्स मेसेजद्वारे संवाद साधताना शब्दांइतकंच महत्त्व हे Emoji इमोजीला आहे.

संवाद साधताना सर्वाधिक इमोजी वापरणाऱ्या युजर्समध्ये भारतीयांचा समावेशदेखील आहे. आजच्या घडीला  इमोजीचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. टेक्स मेसेजद्वारे संवाद साधताना शब्दांइतकंच महत्त्व हे Emoji इमोजीला आहे. इमोजीमुळे संवाद अधिक सहज होतो, समोरच्या व्यक्तींच्या भावना या पटकन कळतात म्हणूनच सर्वांची पसंती ही इमोजीला असते.  दरवर्षी १७ जुलै हा दिवस World Emoji Day  म्हणून साजरा केला जातो.  

भारतात सर्वाधिक वापरला जाणारा इमोजी
२०१०  पासून खऱ्या अर्थानं इमोजी  वापरायला सुरूवात झाली. इमोजी ट्रॅकर या ऑनलाइन पोर्टलच्या माहितीनुसार ट्विटरवर सर्वाधिक ‘tears of joy’ हा इमोजी वापरला जातो. आसू आणि हासू या दोन्ही भावना एकत्र दर्शवणारा हा इमोजी जगभरात सर्वाधिक लोकप्रिय आहे. सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या इमोजीच्या यादीत ‘tears of joy’ अव्वल स्थानी आहे. तर ‘blowing a kiss’ हा इमोजी भारतात सर्वाधिक वापरला जाणारा इमोजी आहे. <

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News