एकही सामना न खेळता भारत 7व्या क्रमांकावर ; काय आहे कारण ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019
  • विराटसेनेची एकही सामना न खेळता 7व्या क्रमांकावर

  • विराटसेना 5 जूनरोजी खेळणार पहिला सामना

  • साऊथ आफ्रिका विरोधात आपला पहिला सामना

भारतीय संघाने एकही सामना न जिंकता पराक्रम केला आहे.  भारतीय संघ गुंतालिकेत 0 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. विराटसेना 5 जूनरोजी साऊथ आफ्रिका विरोधात आपला पहिला सामना खेळणार आहे. दरम्यान, साऊथ आफ्रिका संघाने आपले दोन्ही सामने गमावल्यामुळे सध्या ते आठव्या स्थानावर आहेत. तर अफगाणिस्तान आणि श्रीलंका अनुक्रमे 9व्या आणि 10व्या क्रमांकावर आहेत. साऊथ आफ्रिका, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांचा रनरेट -1.250 च्या खाली असल्यामुळं 0 गुणांसह भारत सातव्या क्रमांकावर आहे. 

 

आयसीसी वर्ल्ड कपला सुरुवात होऊन एक आठवडाही झाला नाही आहे, त्या आधीच धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत.  आश्चर्याची बाब म्हणजे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने एकही सामना न जिंकता पराक्रम केला आहे.  इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पाकने यजमानांना धूळ चारत आपला पहिला विजय नोंदवला. 

आयसीसीच्या नवीन नियमांनुसार सर्व संघाना 9 सामने खेळायचे आहे. सामन्याअंती जे संघ पहिल्या चार क्रमांकावर असतील ते संघ सेमीफायनलपर्यंत पोहचतील. त्यामुळं यंदाच्या विश्वचषकात गुणतालिकेची भुमिका महत्त्वाची असणार आहे.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News