#World Cup 2019 : केदार संघाबाहेरच; बघा भारताचा अंतिम संघ!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

कागदावर परिपूर्ण दिसणारा भारतीय संघ विश्‍वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात रणशिंग कसे फुंकतो याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. भारतीय संघाला चांगली सुरुवात करायची आहे; तर दक्षिण आफ्रिकन संघाला गेलेला तोल सावरायची जिद्द आहे.

साऊदम्पटन : कागदावर परिपूर्ण दिसणारा भारतीय संघ विश्‍वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात रणशिंग कसे फुंकतो याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. भारतीय संघाला चांगली सुरुवात करायची आहे; तर दक्षिण आफ्रिकन संघाला गेलेला तोल सावरायची जिद्द आहे.

आज वातावरण बघून अंतिम 11 जणांची निवड केली जाईल. भरपूर पर्याय आहेत भारतीय संघात, तेव्हा चिंता नाही. केदार जाधवसुद्धा तंदुरुस्त झाला आहे, असे विराट कोहलीने पत्रकार परिषदेत सांगितले. असे असले तरी त्याला आजच्या सामन्यात खेळविण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता भारताच्या अंतिम संघात कोण खेळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असा असेल भारताचा अंतिम संघ

रोहित शर्मा

रोहित शर्माला दुखापत झाली असली तरी त्याची दुखापत गंभूर नसून तो आजच्या सामन्यात खेळण्याचीच जास्त शक्यता आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने सुमार कामगिरी केली असली तरी तो एकदा फॉर्ममध्ये आला तर त्याला रोखणे अवघड आहे.

शिखर धवन

दोन्ही सराव सामन्यांमध्ये शिखर धवनला धावा करण्यात अपयश आले आहे. मात्र, त्याने यापूर्वी आयसीसीच्या प्रत्येक मोठ्या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. तो आणि रोहित शर्मा ही भारताची सर्वांत यशस्वी सलामीची जोडी आहे.

विराट कोहली

विराट कोहलीवर भारताच्या फलंदाजीची मदार आहे. कर्णधार म्हणून त्याचा हा पहिलाद विश्वकरंडक आहे आणि म्हणूनच तो खोऱ्याने धावा करण्यासाठी सज्ज आहे.

लोकेश राहूल

बांगलादेशविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात राहुलने शानदार शतक झळकावित चौथ्या क्रमांकावर आपली जागा फिक्स केली. त्याच्या फॉर्मचा भारताला विश्वकरंडकात नक्कीच फायदा होईल.

एम एस धोनी

भारतीय संघातील सर्वांत अनुभवी खेळाडू असलेला धोनी संघातील प्रत्येक खेळाडूसाठी मार्गदर्शकाचे काम करतो. यंदाच्या वर्षांत त्याचा फॉर्मही परत आला आहे. त्याने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शानदार शतक झळकाविले होते.

हार्दिक पंड्या

आयपीएलमध्ये आंद्रे रसेल नंतर जर कोणाऱ्या फलंदाजीची चर्चा झाली असेस तर तो हार्दिक पंड्या. तो सध्या फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर तुफान फॉर्ममध्ये आहे.

रवींद्र जडेजा

जडेजाने गेल्या काही महिन्यांत तुफान प्रगती करत विश्वकरंडकासाठी संघात स्थान मिळविले आहे. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे संघाच्या फलंदाजीला खोली येईल तर फिरकी गोलंदाजीमध्ये आणखी पर्यंत उपलब्ध होईल.

कुलदीप यादव

भारताच्या फिरकीची मदार कुलदीप यादववर आहे. त्याच्या फिरकीचे कोडे भल्या भल्या फलंदाजांना सोडविता आलेले नाही. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी झालेली नसली तरी त्याने दुसऱ्या सराव सामन्यात सर्वाधिक फलंदाजांना बाद केले होते.

महंमद शमी

महंमद शमीने गेल्या काही काळात खूप प्रगती करत एकदिवसीय संघात पुन्हा स्थान मिळविले आहे. त्याने 2015च्या विश्वकरंडकात चांगली कामगिरी केली होती. याहीवेळीतो चांगली कामगिरी करण्यास सज्ज असेल.

युझवेंद्र चहल

जमलेली जोडी फोडायची कशी तर चहलकडे गोलंदाजी देऊन ही विराट कोहलीची युक्ती चांगलीच चालत आहे. भारतीय फिरकीची जबाबदारी कुलदीपसह चहलवर असणार आहे.

जसप्रित बुमरा

क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम गोलंदाजी म्हणून याची गणना केली जाते. अखेरच्या षटकात त्याची गोलंदाजी आणखीनच बहरतो. भारताच्या वेगवान गोलंदाजीचा तो प्रमुख असणार आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News