जागतिक कॅन्सर दिन: 'अशी' ओळखा लक्षणे आणि करा उपचार
कॅन्सर झाल्याची लक्षणे रुग्णांना लवकर कळाली तर कॅन्सर हा आजार बरा होऊ शकतो. त्यामुळे कॅन्सरची प्राथमिक लक्षणे काय आहेत हे जाणून घेऊया...
कॅन्सरविषयी जनजागृती करण्यासाठी चार फेब्रुवारीला जागतिक कॅन्सर दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. दरवर्षी कॅन्सरच्या आजारामुळे लाखो रुग्ण मृत्यू पावतात. मृत्यृचा आकडा दरवर्षी वाढतच आहे. कॅन्सरला वेळीच आवर घातला नाही तर भविष्यात प्रत्येक कुटुंबात कॅन्सरचा एक रुग्ण आढळून येईत, असे भाकीत जागतिक स्वास्थ संघटनेने केले आहे.
कॅन्सर झालेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. कारण कॅन्सर आजाराची माहिती रुग्णांना उशीरा कळाल्यामुळे त्यांचा मृत्यू होत आहे असे काही संशोधनामधून निष्कर्ष काढण्यात आले. कॅन्सर झाल्याची लक्षणे रुग्णांना लवकर कळाली तर कॅन्सर आजार बरा होऊ शकतो. त्यामुळे कॅन्सर आजाराची प्राथमिक लक्षणे काय आहेत हे जाणून घेऊया...
व्यवस्थित पचन न होणे
अन्न व्यवस्थित पचन न होण्याची समस्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. वयस्करांबरोबर तरुणांनाही या समस्यांनी ग्रासले आहे. भूक लागत नसेल आणि जेवण केल्यानंतर अन्न पचन होत नसेल तर कॅन्सरची लक्षणे असू शकतात. काही दिवसात पचन क्षमता सुरळीत झाली नाही तर कॅन्सरच्या लक्षणांची सुरुवात होऊ शकते.
जुलाब आणि कमी वजन चिंतेची बाब
वातावरणातील बदलामुळे जुलाब होणे सामान्य गोष्ट आहे. पण तीन महिन्यापेक्षा जास्त दिवस जुलाब चालू राहीला तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जेवण करुनही वजन कमी होत असेल तर लिव्हर कॅन्सरची लक्षणे असू शकतात. रुग्णांनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लिव्हर कॅन्सरमुळे शरीरातील विष्टा बाहेर टाकण्याच्या प्रक्रीयेवर विपरीत परिणाम होतो.
खोकला आणि थुंकीवर विशेष लक्ष द्यावे
खोकला आणि थुंकीतून रक्त बाहेर येत असेल तर वेळीस सावध होण्याची आवश्यकता आहे. एखादी दुखापत वेळीच दुरुस्त होत नसेल तर तात्काळ डॉक्टरांची भेट घेऊन निदार करावे ही कॅन्सची लक्षणे असतात.
कमजोरी, थकाव आणि झोप न लागणे
लोकांना वाटत असेल की, या सामान्य समस्या आहेत मात्र हे चुकीच आहे. सतत कमजोरी, थकवा आणि झोप न लागणे ही कॅन्सरची लक्षणे आहेत. या व्यतिरिक्त शरीररात गाठ निर्माण झाली, खुप दिवसांपासून कफ असेल आणि डोक दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ही कॉन्सरची सुरुवात असू शकते.
सामान्य काम करते वेळी दम लागणे
सामान्य काम करतांना सारखा दम लागणे, दम लागल्यामुळे थकवा येणे ही कॅन्सरची प्राथमिक लक्षणे असू शकतात. शरीरातील कॅन्सरची ही लक्षणे ओळखून वेळीच उपचार केला तर कॉन्सर पासून मुक्ती मिळू शकते. यामुळे जागतिक कॅन्सर दिनाचे उद्दीष्ठ साध्य होण्यास मदत होईल आणि जनतेच आरोग्य निरोगी राहील.