दडपण दूर करण्यासाठी स्ट्रेस-फ्री वर्कशॉप

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Wednesday, 19 February 2020
  • पाठांतर न करता अभ्यास कसा करावा? तो लक्षात कसा ठेवावा? 
  • हसत खेळत आनंददायी अभ्यास करण्याचे अप्रतिम तंत्र या वेळी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना अनुभवयास मिळाले

पाली : ‘परीक्षा एक गंमत’ हा विषय घेऊन परीक्षा काळातील पालक, पाल्य आणि शिक्षकांवरील दडपण दूर करण्यासाठी प्रात्यक्षिकासह एकदिवसीय कार्यशाळा नुकतीच वावळोली आदिवासीशाळेत घेण्यात आली. द पीपल्स वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्ट आणि पालक, बालक ट्रेनिंग सेंटर खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

पाठांतर न करता अभ्यास कसा करावा? तो लक्षात कसा ठेवावा? यासह हसत खेळत आनंददायी अभ्यास करण्याचे अप्रतिम तंत्र या वेळी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना अनुभवयास मिळाले. मानवी मेंदूचे वजन किती असते, डावा मेंदू आणि उजवा मेंदू यांचे कार्य कशा प्रकारे होते. ते काय स्वीकारते. शिकण्याच्या पद्धती, ध्येय स्मार्ट असावे, असे सर्व मुद्दे समजावून सांगत विविध प्रयोग प्रत्यक्ष करून दाखवण्यात आले.

बिनतारी संदेश विभाग मुंबई पोलिस हवालदार आणि सुधागड तालुक्‍याचे भूमिपुत्र राजेंद्र वाघमारे यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. खेड्यातील मुलांनाही याचा फायदा मिळाला पाहिजे. तेव्हा कुठे सामाजिक समतोल साधला जाईल, असे वाघमारे यांनी प्रवीणकुमार यांना सांगितले.

त्यांनी त्यावर उत्तर देताना लगेच हो म्हटले. तुमच्या विभागातील दुर्गम भागातील मुलांना हा कार्यक्रम मोफत करू, असे सांगितले. याबरोबरच ‘द्या एक मदतीचा हात’ या वाघमारे यांच्या सामाजिक आवाहनास उज्ज्वला कुलकर्णी यांनी साथ दिली.

 या वेळी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सरिता सावंत, प्राथमिक मुख्याध्यापक दिनेश इंगळे, विजय रावताळे, नरेश गायकवाड, मारुती गायकवाड, गणेश चोरघे, वैत्रवान गुरव, विद्या बागूल, स्वाती मुरकुटे, सरिता शिद, श्वेता जाधव, सेजल जाधव आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News