फवारणी करताना घ्यायची काळजी या विषयावर कार्यानुभव शाळेचे आयोजन

अजिंक्य मेटकर
Saturday, 3 October 2020

अकोला कृषी विद्यापीठातील सुजय प्रल्हादराव काळे या विद्यार्थ्याने गावातील शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन केले.

फवारणी करताना घ्यायची काळजी या विषयावर कार्यानुभव शाळेचे आयोजन

अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील घोराड गावामध्ये ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांनी फवारणी करताना घ्यायची काळजी या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

अकोला कृषी विद्यापीठातील सुजय प्रल्हादराव काळे या विद्यार्थ्याने गावातील शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन केले. त्यामध्ये फवारणी करताना कपडे कशा पद्धतीने घालावे, औषधांची कशाप्रकारे हाताळणी करायची त्याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.

या कार्यशाळेच्या दरम्यान गावातील नागरिक व शेतकरी उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी  डॉ.जिवघाले सर तसेच प्रा.अतुल झोपे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

- अजिंक्य मेटकर

यिनबझ प्रतिनिधी, अमरावती

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News