ऑफीसमध्ये 8 तासापेक्षा अधिक काम करणे ठरु शकते धोकादायक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 17 March 2020

ताणतणाव, एकलकोंडेपणा, हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर, पाठीचे आजार, अंग दुखणे, कबंर दुखी असे शारिरीक आणि मानसिक आजार होण्याची शक्यता असते. 

स्पर्धेच्या युगात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी 8 तासापेक्षा अधिक वेळ कर्मचाऱ्यांना ऑफीसमध्ये बसून काम करावे लागते, त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. ताणतणाव, एकलकोंडेपणा, हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर, पाठीचे आजार, अंग दुखणे, कबंर दुखी असे शारिरीक आणि मानसिक आजार होण्याची शक्यता असते. 

मोठी बातमी: कोरोना इफेक्ट: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा लंडन दौरा रद्द

दररोज आठ तासापेक्षा अधिक काम केल्यामुळे कुटुंब, नातेवाईक, मीत्र- मैत्रीन यांना पुरेसा वेळ देता येत नाही. त्यांच्या सोबतचा संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे एकलकोंडेपणाची भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होत आहे. चिडचिडेपणा अधिक वाढत आहे. सतत एकाच ठिकाणी 8 तासापेक्षा अधिक वेळ बसून काम केल्यामुळे पाठीचे आजार, अंग दुखी असे त्रास कर्मचांऱ्यामध्ये वाढत आहेत. 

मोठी बातमी: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तरुणाची अनोखी शक्कल पाहा व्हिडीओ 

कर्मचाऱ्यांच्या कामावर एक संशोधन करण्यात आल त्यानुसार, भारतीय तरुण कार्यालयामध्ये 52 तास काम करतात तर जपान देशात 46 तास तरुण काम करतात. देशातील तरुणाई ही आठ तासापेक्षा अधिक काम करते. काम करण्याच्या वेळा ही वेगवेगळ्या आहेत. वेगवेगळ्या शिफ्ट नुसार तरुणांना काम करावे लागते. त्यामुळे तरुणाईत नकारात्मकता वाढत चालली आहे आणि मानसिकदृष्ट्या तणावाखाली राहत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News