धक्कादायक! मनरेगाच्या कामावर पी. एचडी, एमबीए, बी.एड्, पदव्युत्तर विद्यार्थीँ आणि...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 21 May 2020

मजूरांसाठी सुरु केलेली मनरेगा योजनेवर पी. एचडी, एमबीए, बी.एड् पदव्युत्तर विद्यार्थीँ, शिक्षण आणि 1 लाख रुपये वेतन घेणारे सॉफ्टवेयर कर्मचारी काम करत आहेत. रोजगाराची अनिश्चितता असल्यामुळे उच्च उदवीधर आणि कर्मचारी काम करत आहे.

हैद्राबाद : कोरोना व्हायरसचे संपुर्ण जगावर सावट पसरले आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी सुरु करण्यात आली. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या, उद्योग, व्यवसाय बंड पडले. लाखो मजूरांच्या नोकऱ्या गेल्या. देशावर आर्थिक संकट कोसळले. मजूरांनाच्या हाताला काम देण्यासाठी सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) सुरु केली. मजूरांसाठी सुरु केलेली मनरेगा योजनेवर पी. एचडी, एमबीए, बी.एड् पदव्युत्तर विद्यार्थीँ, शिक्षण आणि 1 लाख रुपये वेतन घेणारे सॉफ्टवेयर कर्मचारी काम करत आहेत. रोजगाराची अनिश्चितता असल्यामुळे उच्च उदवीधर आणि कर्मचारी काम करत आहे.   

शिक्षक पती- पत्नी मनरेगावर

हैद्राबाद जिल्ह्यातील भोंगीर- यदाद्री गावात राहणारा तरुण चिरंजीवी आणि त्यांची पत्नी दोघे व्यवसायाने शिक्षण आहे. दोघेही पती- पत्नी मनरेगाच्या कामावर जातात. चिरंजीवी हा पदव्युत्तर आहे आणि शिक्षणशास्त्रात (b.ed) पदवी मिळवी. 12 वर्षापासून शिकवण्याचे काम चिरंजीवी करत होता. पत्नी एमबीए आहे. एका प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे. लॉकडाऊमुळे दोन महिन्यापासून शाळा बंद आहेत. दोन महिन्याचे वेतनही शिक्षकांना मिळाले नाही, शाळा केव्हा सुरु होतील निश्चित नाही. त्यामुळे शिक्षक दाम्पत्य मनरेगावर कामाला जातात. आई- वडील, चिरंजीवी त्यांची पत्नी पद्मा आणि दोन मुले असा सहा जनांचा परीवार आहे. दोन महिन्यापासून वेतन मिळावे नाही त्यामुळे त्यांना मनरेगाचा मार्ग स्विकारावा लागला.  

दोन वेळा पी. एचडी केलेले रमेश आणि शारीरिक पदवी प्राप्त केलेले कृष्णा दोघे मनेरगाच्या कामावर आहेत. 'आई- वडील रोजगारासाठी कामावर जातात त्यांना पाहून खुप वाईट वाटते त्यामुळे आम्ही पण त्याच्या सोबत कामवार जाते' असे रमेश म्हणाला. फक्त शिक्षकच नाही तर सॉफ्टवेयर इंजिनिअर एक लाख रुपये वेतन कमवाणारी स्वप्ना मनरेगाच्या कामावर जाते. स्वप्नाकडे जमा असलेली रक्कम काही दिवसात संपुण जाईल. त्यामुळे भविष्यासाठी काही पुंजी जपुन ठेवली पाहीजे. भविष्यात केव्हा गरज लागेल हे सांगता येत नाही त्यामुळे स्वप्ना सासऱ्यासोबत मनरेगाच्या कामावर जाते.  

प्राथमिक शिक्षकांना 5 ते 10 हजार, माध्यमिक शिक्षकांना 20 हजार आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना 25 हजार रुपये वेतन दिले जाते. मात्र, लॉकडाऊनमुळे दोन महिन्यापासून वेतन मिळाले नाही. के. चंद्रशेखर राव सरकार सत्त्तेवर आल्यानंतर शिक्षकांची भरती केली जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वास सरकारने पाळले नाही. टाळेबंदीमुळे माझ्या सारख्या हजारो तरुणांची नोकरी गेली. त्यामुळे उच्चशिक्षित तरुणांना मनरेगावर काम करण्याची वेळ आली. सरकारने बेरोजगार तरुणांसाठी मोठी मदत जाहीर करावी.
- चिरंजीवी, बेरोजगार तरुण  

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News