तरुणांसाठी वर्क फ्रॉम होम जॉब्स 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 April 2020

तरुणांची हीच गरज ओळखून मॉनस्टर या आघाडीच्या नोकरीविषयक पोर्टलने वर्क फ्रॉम होम जॉब्स ही नवी सेवा सुरू केली आहे.

मुंबई: कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन लागू असल्याने अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य दिले आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकरीवर पाणी फिरले आहे. असे अनेक तरुण सध्या वर्क फ्रॉम होम करता येणाऱ्या नोकऱ्यांच्या शोधात आहेत. तरुणांची हीच गरज ओळखून मॉनस्टर या आघाडीच्या नोकरीविषयक पोर्टलने वर्क फ्रॉम होम जॉब्स ही नवी सेवा सुरू केली आहे.

नोकरीविषयक सेवांमध्ये मॉनस्टर गेल्या अनेक वर्षांपासून नवनवीन प्रयोग करत आहे. सध्या कोरोनामुळे ठप्प पडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य दिले आहे. यानिमित्त अनेक कंपन्यांना घरून काम करू शकणाऱ्या मनुष्यबळाची गरज आहे. त्या उद्देशाने मॉनस्टरने खास वर्क फ्रॉम होम या सदराखाली नव्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. मॉनस्टरच्या या नव्या सेवेमुळे नोकरी देऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांना आणि नोकरीची गरज असणाऱ्या तरुणांनाही उत्तम संधी उपलब्ध होईल.

सध्या मॉनस्टरच्या वेबसाईटवर होणाऱ्या एकूण सर्चेसपैकी जवळपास 60 टक्के सर्च हा वर्क फ्रॉम होम या प्रकारातील आहे. अनेक तरुण घरबसल्या करता येत असलेल्या नोकरींच्या शोधात आहेत. त्यामुळे सद्यपरिस्थिती बघता आणि तरुणांची नोकरीची गरज लक्षात घेऊन आम्ही ही सेवा सुरू केल्याची माहिती मॉनस्टरचे सीपीओ अंशुमन मिश्रा यांनी दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News