शब्द कागदावर उतरतात

श्वेता बरकडे
Friday, 20 September 2019

मनातल्या भावना व्यक्त करायला सगळ्यांनाच जमत नसतात
म्हणूनच की काय शब्द आपोआप कागदावर उतरत असतात
त्यातूनच मग कवी आणि कवियत्री तयार होत असतात.

प्रेम कविता करणारे सगळेच प्रेमात असतात
विरहाच्या कविता करणाऱ्यांची मन तुटलेली असतात
आणि मग या जगात कवी आणि कवियत्री तयार होत असतात.

जे कविता करत नाहीत त्यांचे हे असे गोड गैरसमज असतात
प्रेम कविता करणारे सगळेच प्रेमात नसतात
विरहाच्या कविता करणाऱ्यांची मन तुटलेली नसतात.

मनातल्या भावना व्यक्त करायला सगळ्यांनाच जमत नसतात
म्हणूनच की काय शब्द आपोआप कागदावर उतरत असतात
त्यातूनच मग कवी आणि कवियत्री तयार होत असतात.

कविता लिहायला फक्त मन आणि डोळेच पुरेशे असतात
जे डोळ्याने पाहतो त्याचेच मनात शब्द तयार करायचे असतात
आणि मग असेच कवी आणि कवियत्री तयार होत असतात.
     

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News