शब्द...

प्रतिक नागोळकर
Tuesday, 18 August 2020

कधी प्रार्थना आर्जवे असती

वापर होतो शब्दांचा

त्याच शब्दाने तुडविला जाई

दाट संबंध तो नात्याचा

शस्त्राहून खोल घाव तो करितो

असे शस्त्र ते शब्दच रे

विचार परिणामाचा कर तू

फेकण्या आधी ते शब्दच रे ||१||

कौतुक करिती कधी कोणाचे

आशीर्वाद कधी देती ते

कधी भयंकर निखारा वाटे

वाट दाखवी शब्दच ते ||२||

कधी प्रार्थना आर्जवे असती

वापर होतो शब्दांचा

त्याच शब्दाने तुडविला जाई

दाट संबंध तो नात्याचा ||३||

देऊ नको तो कधी कुणाला

शब्द फुकाचा उगीच रे

पूर्ण ना होता परतून येईल

तोच राग त्या शब्दात रे ||४||

शब्दांचा खेळ असे हा मोठा

खेळताना जरा जपून रे

वाटे खेळ जरी हा साधा

महत्त्व तयाचे जाणून घे ||५||

तुही कधी लिहीत जा मानवा

भावना तुझ्या या शब्दात रे

विचार कर त्या मुक्या जीवांचा

कधी ना बोलती शब्दात ते ||६||

 

 

 

 

 

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News