सीबीएसई’तून ‘नापास’शब्दाला तडीपारी

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Wednesday, 19 February 2020

सीबीएसईने तयार केलेल्या नव्या योजनेत नापास हा शब्दच गुणपत्रिकेवर न छापण्याचा निर्णय आहे.

बोर्डाच्या परीक्षेमुळे साऱ्या घरावरच येणारे तणावाचे सावट दूर करण्यासाठी काही टिप्स दिल्या होत्या. एखाद्या परीक्षेत कमी-जास्त मार्क मिळाले म्हणून कोणी जीवनाच्या परीक्षेत नापास होत नाही व तसा शिक्का मारणे बरोबर नाही, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले होते.

सीबीएसईने तयार केलेल्या नव्या योजनेत नापास हा शब्दच गुणपत्रिकेवर न छापण्याचा निर्णय आहे. नापास यासारख्या शब्दांमुळे विद्यार्थी मानसिकदृष्ट्या खचतात, असे मंडळाचे निरीक्षण आहे. कंपार्टमेंट असा शेरा गुणपत्रिकेवर
असतो जे एका विषयात अनुत्तीर्ण होतात.

‘कंपार्टमेंट’ गटातील विद्यार्थी काही महिन्यांनी त्याच विषयाची परीक्षा पुन्हा देऊ शकतात. सीबीएसईचे वरिष्ठ अधिकारी सत्यम भारद्वाज यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, हे शब्द अपमानास्पद आहेत.

त्यामुळे संबंधित परीक्षार्थी-विद्यार्थी ‘डिप्रेशन’मध्ये ढकलले जाऊ शकतात. एक परीक्षा कोणत्याही विद्यार्थ्याचे भाग्य बदलणारी असत नाही व त्याच आधारावर
कोणावर ‘फेल’ असा शिक्का मारणे, हे व्यक्ती म्हणून त्या विद्यार्थ्यावर अन्यायकारकही असल्याचे त्यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News