अद्भुत

शुभांगी दळवी
Tuesday, 6 August 2019

तळकोकणचा प्रदेश सुंदर विलोभनीय भारी
छायाचित्रकाराची तयावरअसे किमया न्यारी 

तळकोकणचा प्रदेश सुंदर विलोभनीय भारी
छायाचित्रकाराची तयावरअसे किमया न्यारी 

खरा किमयागार असेएक तो अनादी अनंत 
चराचर व्यापून जसेउभा राही रमाकांत 

नितांत सुंदर पसरलाहा निळा जलाशय 
अव्यक्त भाव दाटून ठेवी तो गूढ आशय 

जलावरी डोकावून या नभीची भव्यता 
दृश्यात झळकते निसर्गाची दिव्यता 

नभीची निळाई भासे जसा नीलमणी 
जलाशय शोभे जसेभूवरी हिरामणी

नजर घेई माझी क्षितिजावर धाव
हलकेच भेटे मज तिथे स्वप्नातला गाव

नमन माझे या छायाचित्रकारीला 
वंदन करते मी या ईश्वरी देणगीला 

नजरेत न सामावे असा हा दृश्य चराचर 
ठाव न लागे असा हा अदृश्य चित्रकार 

चित्रकाराचे इथे उघडती दिव्य चक्षु 
जनांसी पहावया लागती मन:चक्षु
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News