आश्चर्यच..! या ठिकाणी भरतो चक्क "आशिकों का मेला"

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 January 2020
  • मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर उत्तर प्रदेशातील बांदा या जिल्ह्यातील भुरागड येथे "आशिकों का मेला" भरतो.
  • भुरागड येथील नदीच्या काठावर एक मंदिर आहे, त्याठिकाणी  हा मेळा भरतो.   

भारत हा विविधतेने नटलेला असा देश आहे. सध्या राज्यात सर्वच ठिकाणी जत्रा आणि महोत्सवाचे वातावरण आहे. प्रत्येक राज्यातील ठिकठिकाणी अशा विविध जत्रांचे आयोजन करण्यात येते. यापेक्षा वेगळा असा "आशिकों का मेला" असं आपण फक्त सिनेमात किंवा बोलण्यातच ऐकलं आहे. मात्र भारतात हा मेळा आयोजित करण्यात येतो.

मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर उत्तर प्रदेशातील बांदा या जिल्ह्यातील भुरागड येथे "आशिकों का मेला" भरतो. प्रेमासाठी बलिदान दिलेल्या प्रेमी जीवांची यामागे पार्श्वभूमी आहे. भुरागड येथील नदीच्या काठावर एक मंदिर आहे, त्याठिकाणी  हा मेळा भरतो.   

प्रेमासाठी बलिदान देणारा नट महाबली बितन याच्या स्मरणार्थ याठिकाणी एक मंदिर बांधले गेले आहे. त्या मंदिराला "प्रेम का मंदिर" असं नाव देण्यात आले आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने याठिकाणी प्रेमी युगुल येतात. आपले प्रेम सिद्धीस जावे अशी प्रार्थना याठिकाणी करतात. 

हे मंदिर बांधण्यामागे आणि मेळ्यामागे देखील एक कथा आहे. साधारणतः:६०० वर्षांपूर्वी भुरागडचा एक किल्लेदार होता. मध्यप्रदेशातील एका गावातील नट बितन या किल्ल्यात पोट भरण्याच्या उद्देशाने आला. या नटाकडे कला होती, मात्र अत्यंत गरीब होता. या प्रदेशाची राजकन्या या नटाच्या प्रेमात पडली.  मात्र बितन हा ब्रम्हचारी होता. ज्यावेळी राजाला ही गोष्ट कळली त्यावेळी त्याने बीतनला एक अट घातली. भुरागडसमोर असलेल्या बाम्बेश्वर किल्ल्यापासून भुरागड एक दोरी बांधायची आणि त्यावरून चालत जायचे. या गोष्टीसाठी बितन तयार झाला. 

बितनने दोन्ही किल्ल्यांच्यामध्ये दोर बांधला आणि दोरीवरून चालायला सुरुवात केली. मात्र राज्यातील काही लोकांनी राजाचे मतपरिवर्तन केले. बितनने अट पूर्ण केली, तर त्याचा विवाह राजकन्येशी करून द्यावा लागेल. हे ऐकून राजाने एका बाजूचा दोर कापून टाकला. बितन उंचीवरून खाली कोसळला आणि मरण पावला. हे दृश्य पाहत असलेल्या राजकन्येने देखील खिडकीतून उडी मारून जीव दिला. त्याच ठकाणी या दोघांची समाधी बांधण्यात आली, त्याला "प्रेम का मंदिर" बोलण्यात आले. 

तेव्हापासून याठिकाणी "आशिकों का मेला" भरतो. तसेच अनेक ठिकाणाहून प्रेमीयुगुल येऊन आपले प्रेम चिरंतर टिकावे यासाठी येथे येऊन प्रार्थना करतात. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News