WomensT20WC रविवारी रंगणार भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल

यिनबझ टीम
Thursday, 5 March 2020

सध्या सिडनी येथे सुरू असलेल्या WomensT20WorldCup महिला टी20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने जोरदार कामगिरी सुरूच ठेवली आहे, आतापर्यंत केलेल्या कामगिरीमुळे भारतीय संघ गुणांच्या जोरावर सामना न होताच फायनलमध्ये पोहोचला आहे, तर त्या पाठोपाठ ऑस्ट्रेलिया संघाने देखील दक्षिण अफ्रिकेला हारवत फायनलमध्ये एंट्री मारली आहे.

सिडनी - सध्या सिडनी येथे सुरू असलेल्या WomensT20WorldCup महिला टी20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने जोरदार कामगिरी सुरूच टेवली आहे, आतापर्यंत केलेल्या कामगिरीमुळे भारतीय संघ गुणांच्या जोरावर सामना न होताच फायनलमध्ये पोहोचला आहे, तर त्या पाठोपाठ ऑस्ट्रेलिया संघाने देखील दक्षिण अफ्रिकेला हारवत फायनलमध्ये एंट्री मारली आहे.

 

भारत विरुध्द इंग्लंड सामना रद्द झाल्यानंतर त्याच मैदानात दुपारच्या सत्रात ऑस्ट्रेलिया विरुध्द दक्षिण अफ्रिका असा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने फलंदाजी केल्यानंतर पुन्हा पावसाने व्यत्यय निर्माण केला. त्यावेळी दक्षिण अफ्रिकेसमोर डकवर्थ लुईस  नियमानुसार 13 षटकांत 98 धावांचे लक्ष ठेवण्यात आले होते. मात्र या लक्ष्याची पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेला 5 बाद 92 धावा करता आल्या.

आता फायनलमध्ये पोहोचलेले दोन्ही संघ येत्या रविवारी (8 मार्च) रोजी एकमेकांना भिडणार आहेत. या आदी ऑस्ट्रेलियाने 6 वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे तर त्यापैकी 4 टी20 वर्ल्ड कप त्यांनी आपल्या नावावर केले आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News