येथून होते स्त्रियांच्या लठ्ठपणाची सुरुवात

डॉ. राजीव शारंगपाणी
Monday, 22 April 2019

हेल्थ वर्कलठ्ठ स्त्रियांना मासिक पाळी बंद झाल्यानंतर जास्त त्रास होतो, पण त्या आधी ही लठ्ठपणाची सुरवात कुठून होते ते पाहूया. ‘प्राप्तेतु षोडषेवर्षे गर्दभ्यपि अप्सरा भवेत्‌!’ अशा सुंदर वयापासून आपण सुरवात करूयात. या वयात खरोखरीच सर्व मुली आटोपशीर शरीराच्या असतात. सुदृढ असतात असे मुळीच नाही. निसर्गाने तशी काळजीच घेतलेली असते आणि ही फुलपाखराची स्थिती साधारण चोवीस ते पंचवीस वयापर्यंत टिकते. या छान दिसण्याचा परिणाम म्हणूनच की काय, तिचे लग्न होते आणि मग लठ्ठपणाकडे प्रवास सुरू होतो. लग्न ठरल्याबरोबर सायकल मारणे, वगैरे बंद होते. लग्न होते. मेजवान्या सुरूच राहतात.

हेल्थ वर्कलठ्ठ स्त्रियांना मासिक पाळी बंद झाल्यानंतर जास्त त्रास होतो, पण त्या आधी ही लठ्ठपणाची सुरवात कुठून होते ते पाहूया. ‘प्राप्तेतु षोडषेवर्षे गर्दभ्यपि अप्सरा भवेत्‌!’ अशा सुंदर वयापासून आपण सुरवात करूयात. या वयात खरोखरीच सर्व मुली आटोपशीर शरीराच्या असतात. सुदृढ असतात असे मुळीच नाही. निसर्गाने तशी काळजीच घेतलेली असते आणि ही फुलपाखराची स्थिती साधारण चोवीस ते पंचवीस वयापर्यंत टिकते. या छान दिसण्याचा परिणाम म्हणूनच की काय, तिचे लग्न होते आणि मग लठ्ठपणाकडे प्रवास सुरू होतो. लग्न ठरल्याबरोबर सायकल मारणे, वगैरे बंद होते. लग्न होते. मेजवान्या सुरूच राहतात. त्यानंतर सुस्तपणाही वाढतो. 

शरीराकडे लक्ष? ‘छे! उठायला इतका उशीर होतो की स्वयंपाकाचीच कामं आटपत नाही, मग शरीराकडे बघणार कोण?’ अशातच दिवस जातात! दिवस गेल्यावर तर विचारूच नका. पहिल्या उलट्या होण्याचा काळ संपला, की डोहाळजेवण चालू होतात. सारखे खावेसे वाटते. कौतुकाचा वर्षाव होतो. शरीराकडे आणखी दुर्लक्ष होते. एवढे मोठे पोट घेऊनच ती इतकी दमून जाते, की आणखीन व्यायाम कुठे करायचा? 

प्रसूती झाल्यावर तर चुकीच्या गोष्टी करण्याची जणू चढाओढ लागते. बाळाला एका तासाच्या आत दूध पाजण्याऐवजी ग्लुकोजचे पाणी दिले जाते. बाळाला वरचे दूध दिले जाते. इथे लठ्ठपणाचा मूळ पाया घातला जातो. त्यातच ‘ओली बाळंतीण’ म्हणून हालचाल अजिबात करू दिली जात नाही. सिझेरिअन झाले असेल, तर विचारूच नका. अळिवाचे व डिंकाचे लाडू, तूप असा पहेलवानाच्या वर खुराक चालू होतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News