महिलांची फुटबॉल लीगचे वेळापत्रक जाहीर; या तारखेपासून सुरु होणार खेळ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 22 May 2020

महिला लीग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय 30 एप्रिलला झालेल्या बैठकीत बहुमताने झाला होता.

बर्लिन : जगभरातील क्रीडा संयोजक केवळ पुरुषांच्याच क्रीडा स्पर्धा आणि लीगचा प्रामुख्याने विचार करीत आहेत, त्याचवेळी जर्मनी फुटबॉल महासंघाने पुढचे पाऊल टाकले आहे. त्यांनी पुरुषांच्या फुटबॉल लीगपाठोपाठ महिलांची फुटबॉल लीग सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. जर्मनीतील पुरुषांची फुटबॉल लीग गेल्या आठवड्यात सुरू झाली. आता तेथील महिलांची फुटबॉल लीग 29 मेपासून सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ही लीग तीन महिन्यांनी सुरू होणार आहे. या लीगच्यावेळीही प्रेक्षकांना प्रवेश नसेल, तसेच पुरुषांच्या लीगप्रमाणेच कठोर नियमावली असेल, असे स्पष्ट करण्यात आले.

बंडेस्लिगा अर्थात जर्मनी लीगमधील महिला क्‍लब संघांनीही मोसम सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत एकमेकांना साथ देणे आवश्‍यक आहे, असे जर्मनी फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष फ्रेंत्‌झ केल्लर यांनी सांगितले.

महिला लीग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय 30 एप्रिलला झालेल्या बैठकीत बहुमताने झाला होता. त्या बैठकीत 12 पैकी 11 संघांनी पाठिंबा दिला. बैठकीस एफसी कोलोग्ने अनुपस्थितीत होते. ही लीग 16 सामन्यानंतर थांबली होती. वोल्वस्‌बर्ग 46 गुणांसह अव्वल आहेत. त्यांनी दुसऱ्या क्रमांकावरील बायर्न म्युनिचला 8 गुणांनी मागे टाकले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News