पुरुषांच्या सामन्यांसाठी महिलांना प्रवेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 10 October 2019

‘फिफा’च्या इशाऱ्यानंतर इराणमध्ये घडली क्रांती
 

तेहरान :- वादग्रस्त पुरुषप्रधान धोरणाला संपवले नाही तर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून हद्दपार करू, असा इशारा आंतरराष्ट्रीय फुटबॉलचे पालकत्व असलेल्या फिफाने दिल्यानंतर इराणने अनेक दशकांची परंपरा मोडित काढली आणि पुरुषांच्या फुटबॉल सामन्यांसाठी महिलांना प्रवेश दिला.

गेल्या ४० वर्षांपासून इराणध्ये पुरुषांच्या कोणत्याही सामन्यांना महिलांना प्रवेश दिला जात नाही. पण फिफाने गेल्या महिन्यात इराणला तंबी दिली आणि पुरुषांच्या फुटबॉल सामन्यांना महिलांना प्रवेश देण्यास सांगितले, त्यानंतर महिलांकडून मोठ्या प्रमाणात तिकिटांसाठी मागणी वाढली. एका महिलेने मुलांचे कपडे घालून सामन्याला उपस्थिती लावली होती. हा प्रयत्न समजल्यानंतर अटक होण्याच्या भीतीने तिने जाळून घेतले होते. या प्रकारानंतर फिफा चांगलीच आक्रमक झाली.

महिलांवरचे हे निर्बंध खुले झाल्यानंतर इराणच्या कंबोडियाविद्धच्या विश्‍वकरंडक पात्रता फुटबॉल सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात तिकिटांची मागणी वाढली. पहिल्या टप्प्यातील तिकिटे तर तासाभरात संपली. स्टेडियमची क्षमता १ लाखाची आहे. स्टेडियमला ‘फ्रिडम’ असेही नाव देण्यात आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News