महिलांनी बुडणा-या तरूणांना वाचवण्यासाठी अंगावरच्या साड्या फेकल्या, नंतर झालं असं...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 August 2020

अचानक ओढावलेल्या प्रसंगात महिलांनी दाखवलेल्या धाडसाचं सगळीकडून कौतूक होत आहे.

महिलांनी बुडणा-या तरूणांना वाचवण्यासाठी अंगावरच्या साड्या फेकल्या, नंतर झालं असं...

तामिळनाडूच्या महिलांवरती सोशल मीडियापासून सर्वत्र कौतूकाचा वर्षाव होताना दिसतोय, चार तरूण कोट्टाराईतील एका धरणात बुडताना पाहिल्यानंतर महिलांनी अंगावरच्या साड्या काढून तरूणांच्या दिशेने फेकल्या. महिलांनी केलेल्या धाडसात दोन तरूणांना वाचवण्यात यश आलं. पण प्रयत्न करूनही दोन तरूणांना वाचवण्यात महिलांना यश आले नाही.

मागच्या आठवड्यात १२ तरूणांचा एक ग्रुप क्रिकेट खेळण्यासाठी कोट्टाराई धरण परिसरात गेला होता. क्रिकेट खेळून झाल्यानंतर पोहण्याचा मूड झालेल्या तरूणांनी धरणात उड्या घेतल्या. परंतु पावसामुळे पाण्याची पातळी वाढलेली तरूणांच्या लक्षात आली नाही. त्यावेळी तिथं सेंथमिज सेल्वी (३८), मुथमल (३४) आणि अनंतवल्ली (३४) या तीन महिला कपडे धुण्याचे काम करत होत्या.

कपडे धुवून झालेल्या महिला निघण्याच्या तयारीत होत्या. त्यावेळी तिथं आलेल्या तरूणांनी पाणी किती असेल याचा अंदाज महिलांना विचारला. त्यावेळी महिलांनी पाणी वाढल्याचे सांगितले. परंतु चौघांनी अंघोळीसाठी उड्या घेतल्या. पाण्यात उतरलेले तरूण बुडत असल्याचे दिसल्यानंतर महिलांनी अंगावरच्या साड्या त्यांच्या दिशेने फेकल्या. दोघांना वाचवण्यात यश आलं, तर दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला असे सेंथमिज सेल्वी या महिलेने सांगितले.

कार्तिक आणि सेंथिवेलन या तरूणांना वाचवण्यात महिलांना यश आले, तर पविथ्रन (वय १७) आणि रंजिथ (वय २५) या दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने दोघांचे मृतदेह शोधून काढले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. अचानक ओढावलेल्या प्रसंगात महिलांनी दाखवलेल्या धाडसाचं सगळीकडून कौतूक होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News