लज्जास्पद..! १०० तरुणींना विवस्त्र करत विचारले अश्लील प्रश्न 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 February 2020

ज्या खोलीत तरुणींना ठेवण्यात आलं होते, त्या खोलीचा दरवाजा देखील नीट बंद नव्हता. केवळ एक पडदा लावण्यात आला होता.

सुरत : मेडिकल टेस्ट करण्यासाठी १०० तरुणींना कपडे काढायला लावण्याचा धक्कादायक प्रकार गुजरात येथील महापालिकेच्या रुग्णालयात घडला आहे. या तरुणींना खासगी आणि अश्लील प्रश्न देखील यावेळी विचारण्यात आले. यावेळी कर्मचारी संघटनांनी संबंधित डॉक्टर आणि प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील सुरज महापालिकेच्या रुग्णालयात तरुणींची फिटनेस टेस्ट करण्यातही एका खोलीत विवस्त्र उभं करण्यात आले होते. १०-१० च्या ग्रुपने या तरुणींना तपासण्यात येत असून त्यांना खासगी प्रश्न देखील विचारण्यात आले होते. ज्या खोलीत तरुणींना ठेवण्यात आलं होते, त्या खोलीचा दरवाजा देखील नीट बंद नव्हता. केवळ एक पडदा लावण्यात आला होता. या फिटनेसच्या नावाखाली तरुणींशी गैरप्रकार करण्यात आला. या तरुणींना काही अश्लील प्रश्न देखील विचारण्यात आले. यामध्ये खासगी प्रश्नांमध्ये तुम्ही कधी गर्भवती झाले होतात का? असं देखील विचारण्यात आले. 

याबाबत अनुसंधान रुग्णालयातील स्त्री रोग विभागाच्या प्रमुख म्हणाल्या की, 'रुग्णालयाच्या नियमांनुसार महिलांची शारीरिक चाचणी करणे बंधनकारक आहे. महिलांना कोणता आजार आहे का, याची खात्री करून घेणे गरजेचे असते, तसं नियमांतच आहे. यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी 'कौमार्य चाचणी’ केल्याचा आरोप देखील या तरुणींनी केला आहे. त्यामुळे यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

दरम्यान, या आधी गुजरातमधील एका कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना कपडे काढायला लावण्याची घटना घडली होती. कोणत्या तरुणीला मासिक पाळी सुरु आहे, किंवा नाही? हे जाणून घेण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने हे कृत्य केले होते. हे प्रकरण ताजे असतानाच सुरतमधील या घटनेने पुन्हा एकदा महिलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News