'या' कारणांमुळे बहुतांश महिला चांगल्या पगाराची नोकरी सोडतात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 9 September 2019

ब्रिटन स्टॅटीस्टिकच्या अहवालातून नोकरी करणाऱ्या महिलांच्याबाबतीत एक अहवाल समोर आला आहे. लांबच्या प्रवासाचा त्रास नको म्हणून अनेकदा महिला चांगल्या पगाराची नोकरी सोडून घराजवळ असणारी आणि कमी पगाराची नोकरी स्विकारतात. पहिल्यांदाच प्रवासाची वेळ आणि  वेतनातील तफावत यांची सांगड घालून संशोधन करण्यात आलं आहे. 

त्यामुळे  पुरुष- स्त्रियांना  मिळणाऱ्या वेतनातील तफावती मागचं हे देखील कारण असू शकतं, असं यात म्हटलं आहे. तसेच कुटंबाची, लहान मुलांची काळजी घेण्यासाठी महिला अनेकदा आपली चांगली पगाराची नोकरी आणि वेळप्रसंगी करिअरदेखील सोडतात, अशी माहिती ब्रिटनच्या महिला विभागानं दिली आहे. अनेकदा संसार आणि काम हे दोन्ही सांभाळणं महिलांसाठी कसरतीसारखं असतं. त्यामुळे लांबचा प्रवास हे महिलांनी नोकरी सोडण्याचं प्रमुख कारण असल्याचं ONS नं आपल्या संशोधनात म्हटलं आहे. 

लांबचा प्रवास हा मुद्दा देखील असमान वेतनासाठी कारणीभूत आहे असा निर्ष्कष ऑफिस फॉर नॅशनल (ONS)स्टॅटीस्टिकनं काढला आहे. ऑफिसला जाण्यासाठी तासाभराहून अधिकचा प्रवास करावा लागत असेन तर अनेकदा २९.१ % महिला आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडतात. महिला प्रवासचं  अंतर कमी असेन अशी नोकरी निवडतात, मग ती नोकरी कमी पगाराची असली तरीही महिला तडजोड करायला तयार होतात. मात्र लांबच्या प्रवासामुळे नोकरी सोडण्याचं पुरुषांचं प्रमाण हे महिलांच्या तुलनेत  २३.९ %  आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News