तरुणींच्या मानसिक आरोग्यासाठी महिला आयोगाची हेल्पलाईन २४ काम करणार; अशी मिळणार सेवा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 August 2020

एप्रिल २०२० ते ऑगस्ट २०२० पर्यंत २ हजार ३२० मनसिक स्वस्थ आणि भावनीक शोषणाच्या तक्रारी आयोगाकडे आल्या आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० या दरम्यान १ हजार ५५० तक्रारी आयोगाकडे दाखल झाल्या होत्या. मात्र यंदा मानसिक समस्यांच्या तक्रारीचे प्रमाण वाढले आहे.

नवी दिल्ली : लॉकडाऊन काळात तरुणीचे मानसिक सोशन वाढल्यामुळे त्यांच्या मदत आणि समुपदेशनासाठी देशभर हेल्पलाईन सुरू करण्याची घोषणा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केली. टाळेबंदी काळात महिला आणि पुरुष दोघेही घरामध्ये एकत्र राहत होते. त्यामुळे महिलांना वर्क फ्रॉम होम करुन घरकाम करावे लागायचे. अशा परिस्थितीत त्यांचे मानसिक संतुलन ढासळू लागले, मन व्यक्त करण्यासाठी घराबाहेर पडणेही अशक्य होते, अशा परिस्थितीत तरुणींनी राष्ट्रीय महिला आयोगाचा दरवाजा ठोठावला. आयोगाने महिलांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन २४ तास हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. येत्या काही दिवसात ही हेल्पलाइन सुरू केली जाणार आहे. 

सर्व प्रथम उत्तर भारतात महिला समुपदेशनाची हेल्पलाईन सुरु केली जाईल, त्यानंतर हळूहळू संपूर्ण भारतासाठी कार्यान्वीत केली जाणार आहे, त्यासाठी चंदीगड चिकित्सा अनुसंधान शिक्षण संस्था मदत करणार आहे' असे अध्यक्ष रेखा शर्मा यांनी सांगितले.

एप्रिल २०२० ते ऑगस्ट २०२० पर्यंत २ हजार ३२० मनसिक स्वस्थ आणि भावनीक शोषणाच्या तक्रारी आयोगाकडे आल्या आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० या दरम्यान १ हजार ५५० तक्रारी आयोगाकडे दाखल झाल्या होत्या. मात्र यंदा मानसिक समस्यांच्या तक्रारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्त्रियांना मानसिक मदत करण्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. या हेल्पलाईनमुळे स्त्रियांना घरी बसून समुपदेश मिळणार आहे. त्याच बरोबर तक्रारीचे निवारण करण्यासाठी महिलांना मदत होणार आहेत. मात्र प्रत्यक्षात हेल्पलाइन सुरु झाल्यानंतर अंमलबजावणी कशी होते यावर योजनेचे भवितव्य लांबून आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News