महिलेने भारतात या ठिकाणी शूट केला न्यूड व्हिडीओ, मग...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 30 August 2020

महिलेने भारतात या ठिकाणी शूट केला न्यूड व्हिडीओ, मग...

नवी दिल्ली - उत्तराखंडच्या ऋषिकेशमधील गंगा नदीवर बनवलेल्या प्रसिद्ध लक्ष्मण झुल्यावर एका परदेशी महिलेने न्यूड व्हिडिओ बनवल्याबद्दल तिला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर महिलेला समज देऊन काही अटींवर जामीन मिळाला आहे. विशेष म्हणजे या महिलेला भारतात सार्वजनिक ठिकाणी न्यूड व्हिडिओ बेकायदेशीर असतं माहितं नव्हतं.

मागच्या आठवड्यात २७ वर्षीय महिला लक्ष्मण झुल्यावर पोहोचली, तिथं गेल्यानंतर तिने व्हिडिओ शुट करायला सुरूवात केली. त्यावेळी तिथं असलेल्या लोकांनी हा प्रकार पाहिला. हा प्रकार तिथल्या स्थानिक लोकांनी नगरसेवक गजेंद्र सजवान यांच्या कानावर घातला. त्यांनी संबंधित महिलेची पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.

सोशल मीडियावर ही माहिती मिळाल्याचं नगरसेवकांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. त्याचबरोबर ही महिला ज्यावेळी शूट करत होती. त्यावेळी तिथं अनेकांनी तिला पाहिलेलं सुध्दा आहे असं मुनी की रेती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ उपनिरीक्षक आर. के. सैनी यांनी सांगितले.

नगरसेवकांनी केलेल्या तक्रारी नंतर पोलिसांनी त्या महिला विरोधात तक्रार केली. महिलेला ताब्यात घेऊन ज्यावेळी चौकशी केली त्यावेळी महिलेले शूट केल्याचे तपासादरम्यान दिसून आले. भारतात सार्वजनिक ठिकाणी ही अश्लीलता मानली जाते. संबंधीत महिला जवळच्या एका हॉटेलमध्ये थांबल्याचे तेथील स्थानिकांनी सांगितले.

पोलिसांनी महिलेचा शोध घेतला. चौकशीदरम्यान भारतात हे बेकायदेशीर असल्याचं माहित नसल्याचं महिलेने पोलिस स्टेशन मध्ये सांगितलं तसेच केलेला गुन्हा मला मान्य असल्याचं सुध्दा सांगितलं. मणी आणि नेकलेसच्या व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ आणि फोटोशूट केल्याचं या महिलेनं सांगितलं.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News