महिलेवर एक्स बॉयफ्रेंडने केला बलात्कार; व्हिडीओ झाला व्हायरल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 August 2020

महिलेने व्हिडीओ कॉल घेण्यास नकार दिल्यानंतर पांडूरंगने स्वत: कडे असलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी महिलेला दिली.

महिलेवर एक्स बॉयफ्रेंडने केला बलात्कार; व्हिडीओ झाला व्हायरल

नागपूर - वारंवार बलात्काराची प्रकरणं उघडकीस येत आहेत, त्यातचं नागपूरात एक्स बॉयफ्रेंडने महिलेला धमकी देवून बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी पांडूरंग हरीशचंद्र पारगावे याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

महिला भंडारा येथील रहिवासी असून २०१५ मध्ये महिलेचे आणि पांडूरंग हरीशचंद्र पारगावे प्रेमसंबंध होते. त्यावेळी दोघांचेही शारिरीक संबंध झाले होते. तेव्हा पांडूरंगने झालेल्या शारिरीक संबंधाचा व्हिडीओ तयार केला होता. कालांतराने महिलेचे इतर ठिकाणी लग्न झाले.

महिलेचा मुलगा लातूर मध्ये राहत असल्याचे पांडूरंगला समजले. पांडूरंगने सदर महिलेला व्हिडीओ कॉल करण्यास सुरूवात केली. महिलेने व्हिडीओ कॉल घेण्यास नकार दिल्यानंतर पांडूरंगने स्वत: कडे असलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी महिलेला दिली.

घाबरलेल्या महिलेला पांडूरंगने रामटेकला बोलावून घेतले. जवळच्या हॉटेलवरती नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वारंवार महिलेला फोन करून ब्लॅकमेल करू लागला. यादरम्यान दोघांमध्ये मोठी वादावादी झाल्यानंतर पांडूरंगने महिलेच्या नातेवाईकांचा एक व्हॉट्सअप्प ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपमध्ये तो व्हिडीओ शेअर केला. या प्रकाराबाबत महिलेला कळल्यानंतर महिलेने तात्काळ पतीलासोबत घेऊन रामटेक पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिस पांडुरंगचा शोध घेत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News