एका महिलेचं होतं 100 पुरुषांसोबत अफेअर; सांगितलं हे कारण

यिनबझ टीम
Monday, 23 December 2019

एका महिलेचे म्हणणे आहे की तिचे जवळजवळ 100 विवाहित पुरुषांशी प्रेमसंबंध होते. मिरर डॉट कॉमच्या एका वृत्तानुसार, लंडनमध्ये राहणारी 47 वर्षीय महिला 'ग्वेनीथ लीट' हिने आपल्या अशा 'प्रेम प्रकरण'साठी तिच्या 'चीटिंग जीन'ला जबाबदार धरले आहे.

गेल्या काही दशकांपासून माझे जवळपास 100 हून अधिक पुरुषांशी प्रेमसंबंध होते, याचे कारण एकच की माझे आई-वडीलही अनेकांशी फसवणूक करीत होते आणि त्यामुळे तेच गुणधर्म माझ्यात आले असल्याचे ग्वेनीथ सांगते.

त्याचबरोबर एका अभ्यासानुसार असेही समोर आले आहे की जर एखाद्याचे पालक विश्वासघातकी असतील तर अशा लोकांची फसवणूक होण्याची अधिक शक्यता असते. एलिसाइट एन्काऊंटर्सच्या अभ्यासानुसार दोन तृतीयांश महिलांच्या बाबतीत असे आढळले की त्यांच्या पालकांनीही खूपवेळा फसवणूक केली आहे.

ग्वेनीथ सांगते की, पतीच्या मृत्यूनंतर तिने अनेक विवाहित पुरुषांना डेट करण्यास सुरुवात केली. आपले मन कोणत्या ना कोणत्या गोष्टीत रमुन ठेवण्यासाठी ती असे प्रकार करत असल्याचे तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले.

फसवणूक करण्यामध्ये वडिलांचा प्रभाव मुलावर आणि मुलीवर आईचा प्रभाव अधिक दिसून आला. अभ्यासामधील अर्ध्या पुरुषांनी एक गोष्ट मान्य केली आहे की, त्यांच्या वडिलांनीही काहीवेळा अनेकींशी फसवणूक केल्याने मुलांनाही ती सवय लागली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News