कोणताही क्लास न लावता शेतकऱ्याचा मुलगा झाला आयपीएस

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 August 2020
  • केंद्रीय लोकसेवा आयोग २०१९ चा निकाल काल जाहीर झाला. अत्यंत खडतर अशा या परीक्षेत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील लहान गावातील कांतीलाल सुभाष पाटील यांने कठोर मेहनत घेऊन यश मिळवले असून त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भुसावळ :-  केंद्रीय लोकसेवा आयोग २०१९ चा निकाल काल जाहीर झाला. अत्यंत खडतर अशा या परीक्षेत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील लहान गावातील कांतीलाल सुभाष पाटील यांने कठोर मेहनत घेऊन यश मिळवले असून त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. २०१९ साली घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून यात भुसावळ तालुक्यातील कांतीलाल सुभाष पाटील हे ४१८ रॅंक मिळवून उत्तीर्ण झाला आहे.

कांतीलालने आधी आपल्या गावीच अभ्यास केला. त्यानंतर पुढील अभ्यासाठी तो पुण्यात पोहोचला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे घरून जास्त पैसेही मिळत नव्हते. त्यामुळे  कुठलाही महागडा क्लास कांतीलालने लावले नाही. नीट अभ्यासाचे नियोजन केले आणि  कठीण मेहनत करून त्यांनी हे यश मिळविले आहे.

कांतीलाल याचे वडील शेती करतात. घरची परिस्थिती ही हालाकीची होती. परंतु या परिस्थितीत अनेक अडचणींवर मात करत कांतीलालने यश प्राप्त केले आहे. कांतीलालचे प्राथमिक शिक्षण हे गावात झाले असून माध्यमिक शिक्षण हे वरणगाव येथे झाले आहे. पुढिल शिक्षण के. के. वाघ या अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी या विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले. पुढे अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगत पुणे येथे यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. सलग ५ वर्ष आलेल्या अपयशानंतरही खचून कठीण मेहनत करून त्याने हे यश मिळवले आहे. या यशात  त्यांना त्यांच्या कुटुंब आणि मित्रांचे सहकार्य लाभले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News