मुलाखती शिवाय शिक्षक भरती; कोर्टाचा महत्त्वपुर्ण निर्णय, अशी आहे प्रक्रीया

यिनबझ टीम
Monday, 23 March 2020
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव खरदारीचा उपाय म्हणून सर्व पदभरती ३१ मार्च पर्यंत स्थगित केली आहे. ३१ मार्च नंतर परिस्थितीचा आढावा घेऊन भरती संदर्भात योग्य ती कार्यवाही केली जाईल अशी माहिती सोमवारी (ता.२३) पवित्र पोर्टवर प्रसिद्ध करण्यात आली.

मुंबई: अनेक दिवसापासून रखडलेली शिक्षक भरती लवकरच पुर्ण होणार आहे. मुलाखतीसह आणि मुळाखतीशिवाया अशा दोन टप्यात शिक्षक भरती करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव खरदारीचा उपाय म्हणून सर्व पदभरती ३१ मार्च पर्यंत स्थगित केली आहे. ३१ मार्च नंतर परिस्थितीचा आढावा घेऊन भरती संदर्भात योग्य ती कार्यवाही केली जाईल अशी माहिती सोमवारी (ता.२३) पवित्र पोर्टवर प्रसिद्ध करण्यात आली.

मुलाखतीशिवाय पद भरती
९ मार्च २०१९ रोजी पवित्र प्रणाली मार्फत मुलाखतीशिवाय पदभरतीची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यातील अनेक पदे रिक्त आहेत. विषयनिहाय, प्रवर्गनिहाय रिक्त पदे, गैरहजर उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे, उमेदवार अपात्र ठरल्यामुळे रिक्त राहिलेल्या पदासाठीची निवड प्रक्रिया प्रथम करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरु आहे. ही कार्यवाही मुलाखतीसाठीची यादी जाहीर करण्यापूर्वी करण्यात येणार आहे.

मुलाखतीसह पद भरती
नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार ज्या उमेदवारांना ५० टक्क्यापेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम देण्यात आले नाहीत त्यांना MEPS नियमानुसार खाजगी माध्यमिक शाळेसाठी उत्तीर्ण आणि उच्च माध्यमिक शाळेसाठी किमान द्वितीय श्रेणी असणाऱ्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम द्यावयाचे आहेत.

ज्या उमेदवारांना यापूर्वी इयती ११ वी आणि १२ वीच्या गटासाठी ५०टक्क्यापेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम देण्यात आले नाहीत परंतु असे उमेदवार पदव्युतर पदवी किमान व्दितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असतील, त्यांना मुलाखतीसह पदासाठीचे प्राधान्यक्रम घेण्यात येणार आहेत.

इयता ९ वी आणि १० वी गटातील पदासाठी उमेदवार पदवी स्तरावर उत्तीर्ण आहे परंतु ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम दिले नाहीत अशा उमेदवाराकडून मुलाखतीसह पदासाठीचे प्राधान्यक्रम देण्यात येणार आहेत.

खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील रिक्त पदासाठी उच्च वयोमर्यादा लागू करण्यात आलेले होती. त्यामुळे कमाल वय या कारणास्तव ज्या उमेदवारांना मुलाखतीसह पद भरतीचा पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम देता आलेले नाहीत त्यांना महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती ) नियमावली १९८१ मधील तरतुदीनुसार प्राधान्यक्रम देण्यात येणार आहेत. पदव्युतर पदवी व्दितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले आणि वयोमर्यादा लागू करण्यात आलेल्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करावयाचे आहेत.

पदव्युतर पदवी व्दितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले आणि वयोमर्यादा लागू करण्यात आलेल्या उमेदवारांनी यापूर्वी मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केलेले नाहीत व आता नव्याने मुलाखतीसह पदांचे प्राधान्यक्रम देणार आहेत त्यांना त्यांच्या समांतर आरक्षणाची (उदा. महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अनाथ इ ) नोंद एकदाच करता येईल. त्यामुळे उमेदवारांनी एकदा माहिती save केल्यानंतर पुन्हा समांतर आरक्षण दुरुस्त करण्याची सुविधा दिली नसल्याने अशा उमेदवारांनी समांतर आरक्षण विषयक माहिती काळजीपूर्वक नोंद करावी. एकदा माहिती नोंद करून save करून येणाऱ्या फॉर्म समोर ok वर क्लिक केल्यानंतर पुन्हा माहितीमध्ये बदल करता येणार नाही.

ज्या उमेदवारांनी यापूर्वी जून २०१९ मध्ये मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत त्यांनी पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम देण्याची आवश्यकता नाही असे पवित्र पोर्टलकडून सांगण्यात आले.

अधिक माहितीसाठी- https://edustaff.maharashtra.gov.in/

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News