एटीएममधून पैसे काढतायं? त्यापूर्वी वाचा हे बदल 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020
  • नोटबंदी झाल्यानंतर २ हजारांच्या नोटा चलनात आल्या. काही दिवसांनी या नोटा देखील चलनातून काढण्यात येणार असल्याची चर्चा सुरु होती.

नवी दिल्ली : नव्या आर्थिक वर्षांपासून अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यासोबतच एटीएममध्ये पैसे काढताना देखील काही बदल होणार आहेत. एटीएममधून दोन हजारांची नोट काढल्यानंतर त्याचे सुट्टे मिळणे कठीण होते. त्यामुळे २ हजार रुपयांच्या नोटेऐवजी इतर नोटांचा पुरवठा अधिक होण्याची शक्यता आहे.  

देशात जवळपास २.४० लाख एटीएम मशिन्समध्ये बदल करण्यात येणार आहे. मात्र हे होणारे बदल चांगले असण्याचे संकेत यापूर्वीच देण्यात आले आहे. दोन हजारांच्या नोटांपेक्षा लहान डिनॉमिनेशनच्या नोटांचा अधिक वापर होतो, त्यामुळे पुढील काही महिन्यामध्ये या गोष्टींमध्ये बदल होणार आहे. 

त्यामुळे बँक आणि एटीएम ऑपरेटर्सपुढे हे आव्हानात्मक असणार आहे. एटीएममध्ये २ हजार रुपयांऐवजी ५०० आणि १०० रुपयांची कॅसेट लावण्यात येईल. यामध्ये ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

नोटबंदी झाल्यानंतर २ हजारांच्या नोटा चलनात आल्या. काही दिवसांनी या नोटा देखील चलनातून काढण्यात येणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र अशा पद्धतीचे कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितलं आहे. 

दोन हजारांच्या नोटा बंद होणार या गोष्टीकडे लक्ष न देण्याचे आवाहन देखील यावेळी अर्थमंत्र्यांनी केलं आहे. दोन हजाराच्या नोटेपेक्षा वेगळ्या नोटा एटीएममध्ये दिल्यास ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News