फिरायला जाताय..? हे आहेत विंटर हॉलीडे डेस्टिनेशन्स

यिनबझ ऑनलाईन टीम
Saturday, 2 February 2019

हिवाळा म्हटलं की , पिकनिक, ट्रेकिंगचे वेध लागतात. मग सगळ्यांचे प्लॅन्स तया होतात. हिवाळ्यात फिरायला जाण्यासाठी देशभरात अनेक ठिकाण आहेत. मात्र आजही काही निवडक ठिकाण सर्वाधिक महत्व दिलं जात. 

     फिरायला जाण्याची खरी मजा तर हिवाळ्यातच. या दिवसांत जवळपास प्रत्येक जण मित्रांसोबत किंवा फॅमिलीसह सुट्टी घालविण्याचे प्लॅनिंग जरूर करतो. अशावेळी कुठे जायचे याच्यावर बरीच चर्चा होते. मात्र, डेस्टिनेशन पक्क करताना भरपूर गोंधळ उडतो. त्यामुळे तुम्ही जर फिरायला जाण्याच्या विचारात असाल, तर थंड आणि बर्फाळ भागाचा पर्याय जरूर निवडा. ही आहेत काही निवडक ठिकाणं 

काश्मीर : 
निसर्गाच्या सान्निध्यात थंडी आणि बर्फाची मजा घ्यायची इच्छा असेल, तर आपल्या मनात सर्वांत आधी नाव येते ते काश्मीरचे. भारताचे नंदनवन किंवा मिनी स्वित्झर्लंड म्हणून काश्मीरची ओळख आहे. त्यामुळे तरुणाईला सदैव खुणावणारे पर्यटनाचे ठिकाणही काश्मीरच आहे. पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग असेल, तर ते काश्मिरातच आहे. विंटर हॉलीडे डेस्टिनेशनच्या यादीमध्ये काश्मीर सदैव पहिल्याच क्रमांकावर असते. येथील बर्फाच्छादित पहाड जणू एखाद्या कापसाच्या पुंजक्यासारखे भासतात. येथे विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. 

शिमला: 
ही हिमाचल प्रदेशची राजधानी असून पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. श्यामलदेवीच्या नावावरून या शहराचे नाव पडले आहे. जमिनीपासून सुमारे सात हजार दोनशे फुटांवर वसलेले हे ठिकाण सर्वांच्याआकर्षणाचे केंद्र आहे. हिवाळ्यात बर्फाच्छादित पहाड पर्यटकांना मोहित करतात. तरुणांना येथे फिशिंग, स्किइंग, ट्रेकिंगसह अन्य ॲडव्हेंचरस स्पोर्टसची मजा लुटता येते. भारतातील हनिमून डेस्टिनेशन्सच्या यादीमध्ये काश्मीर आणि शिमला सदैव अग्रस्थानी असतात.  

ऑली : 
हे ठिकाण उत्तराखंडच्या गढवाल क्षेत्रात वसलेले ठिकाण आहे. आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ऑली हे ठिकाण ओळखले जाते. येथे भेट देण्याची योग्य वेळ केवळ हिवाळ्यातच आहे. 

केदारकंठ :
कडक थंडीच्यामोसमात मित्रांसोबत ट्रेकिंगची मजा लुटायची असेल, तर उत्तराखंडमधील केदारकंठ ट्रॅक सर्वोत्तम पर्याय आहे. येथे तब्बल ९५८ वर्गकिलोमीटर परिसरात ट्रेकिंग करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे येथे नेहमीच युवा पर्यटकांची गर्दी असते. 

कुल्लूमनाली :
नैसर्गिक सौंदर्य आणि ॲडव्हेंचर स्पोर्टसचा उत्तम पर्याय कुल्लूमनालीमध्ये पर्यटकांना अनुभवायला मिळतो. ‘व्हॅली ऑफगॉड’च्या नावाने ओळखले जाणारे हे ठिकाण ॲडव्हेंचर लव्हर्ससाठी पहिल्या पसंतीचे ठिकाण आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News