ही तरुणी होणार मुख्यमंत्री?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 9 March 2020

लंडन येथे वास्तव्यास असणारी प्रिया चौधरी थेट मुख्यमंत्री पदासाठी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे तिने प्रसार माध्यमाद्वारे सांगितले.

भारत हा तरुणाईचा देश आहे, तरुणाईने ठरल तर देशात मोठ्या प्रमाणात परीवर्तन होऊ शकते. परीवर्तनाचा वेग वाढवण्यासाठी राजकीय इच्छा शक्तीची गरज असते. त्यामुळे तरुणाई राजकारणाचा मार्ग निवडतात आणि राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करण्याचा प्रयत्न करतात. लंडन येथे वास्तव्यास असणारी प्रिया चौधरी थेट मुख्यमंत्री पदासाठी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे तिने प्रसार माध्यमाद्वारे सांगितले.

जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी (ता.8) बिहार मधल्या हिंदी, इंग्रजी दोन्ही वृत्तपत्राना संपुर्ण पान जाहीरात देऊन आपण बिहार विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे प्रियाने सांगितले. 'प्युरल्स' नावाचा पक्ष लवकच स्थापण करणार असल्याचे प्रियाने स्पष्ट केले. ज्या लोकांचे बिहारवर प्रेम आहे मात्र, राजकारण नको आहे असा लोकांनी प्युरल्स मध्ये सामिल व्हा असे आवाहन प्रियाने केले आहे. मी मुख्यमंत्री झाली तर 2025 पर्यंत देशातल सर्वांधिक प्रगतशिल राज्य बिहार असेल, 2030 प्रर्यत बिहारचा युरोप खंडातील देशाप्रमाणे कायापलट होईल असा दावा प्रियाने केला.    

 

26 वर्षाची प्रिया चौधरी जनता दल युनायटेड पक्षाचा नेता विनोद चौधरी यांची मुलगी आहे. सध्या लंडण येथे वास्तव्यास आहे. प्रिया अचानकपणे राजकारणात प्रवेश करुन मुख्यमंत्री पदासाठी निवडणूक लढवणार असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपा, जदयू, एलपीजी यांनी एकत्र येवून बिहारमध्ये सरकार स्थापन केले. या सरकारला हादरे बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News