'मन्नत' भाड्याने देणार का? प्रश्नावर शाहरुखने दिलं 'असं' उत्तर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 January 2020
  • एका ट्विटर यूजरने शाहरुखला त्याचं राहतं घर म्हणजेच 'मन्नत'मध्ये एका रूममध्ये राहण्यासाठी किती भाडं द्यावं लागेल? असा प्रश केला. या प्रश्नावर शाहरुखच आलेलं उत्तर हे खूप इंटरेस्टिंग होतं.

मुंबई : 'किंगऑफ रोमान्स' म्हणून शाहरुख खानची जगभरात ओळख आहे.  केवळ देशभरात नाही तर जगभरात शाहरुखचे असंख्य चाहते आहेत.आणि त्यामुळेच शाहरुख सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. सोशल मीडियावर तो त्याचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओदखील शेअर करत असतो.  

अशाच शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता शाहरुख तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. काही दिवसांपूर्वी शाहरुखने त्याच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवरून 'Ask me anything'द्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यामध्ये शाहरुखने त्याच्या चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. अशा अनेक प्रश्नांमध्ये त्याच्या घराविषयी एक प्रश विचारण्यात आला. एका ट्विटर यूजरने शाहरुखला त्याचं राहतं घर म्हणजेच 'मन्नत'मध्ये एका रूममध्ये राहण्यासाठी किती भाडं द्यावं लागेल? असा प्रश केला. या प्रश्नावर शाहरुखच आलेलं उत्तर हे खूप इंटरेस्टिंग होतं. उत्तर देताना शाहरुख म्हणाला की, 'मन्नत'मध्ये राहण्यासाठी पैसे नाही तर कठोर मेहनतीची गरज आहे. आणि तेही ३० वर्ष मेहनत केल्यानेच हे शक्य होईल. 

त्याचप्रमाणे या प्रश्नाचेच नाही तर क्रिकेटसंबंधी त्याला एक प्रश विचारण्यात आला की, यंदाच्या IPL मध्ये 'कोलकाता नाईट रायडर्स' संघात शुभमन गिलला कर्णधार कधी करणार? तर या प्रश्नाचेही शाहरुखने अगदी सहज उत्तर दिले की,तुम्हाला जेव्हा या संघाचा कोच नेमण्यात येईल तेव्हा'. असे उत्तर दिले.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News