क्रिकेट प्रक्षेपणाच्या किमतीतही होणार घट ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 July 2020

स्टार इंडिया आणि क्रिकेट न्यूझीलंड यांच्यातील प्रक्षेपण हक्काबाबतचा करार अंतिम स्वरूप घेण्यास तयार नाही. दोघांत तीन वर्षांपूर्वी वर्षाला साडेतीन कोटी डॉलरचा करार झाला होता.

ऑकलंड: स्टार इंडिया आणि क्रिकेट न्यूझीलंड यांच्यातील प्रक्षेपण हक्काबाबतचा करार अंतिम स्वरूप घेण्यास तयार नाही. दोघांत तीन वर्षांपूर्वी वर्षाला साडेतीन कोटी डॉलरचा करार झाला होता. याच रकमेवर पुन्हा करार करण्यास स्टार इंडिया तयार नसल्याचे समजते. न्यूझीलंडच नव्हे, तर प्रक्षेपण करार संपलेल्या अनेक क्रिकेट मंडळाना नवे करार करताना सध्याची रक्कम राखण्यासाठीही कष्ट पडत आहेत.

सध्याची आर्थिक परिस्थिती, त्याचबरोबर कोरोनामुळे आलेले आर्थिक संकट या परिस्थितीत स्टार इंडियास कमी रकमेत करार हवा आहे. मायदेशातील सामन्यांच्या प्रक्षेपणासाठी करार करण्यात पाकिस्तान, वेस्ट इंडिज तसेच श्रीलंका यांनाही प्रश्न येत आहेत.

आयपीएलव्यतिरिक्त भारतात खेळाच्या प्रसारणास जाहिराती मिळवण्यात प्रश्न येत आहेत. त्यातच कोरोनामुळे प्रश्न बिकट होतील. काही वर्षांपर्यंत भारतात खेळांच्या प्रक्षेपण हक्कांसाठी चुरस होती; पण आता दोनच प्रमुख प्रक्षेपक कंपन्या आहेत, असे सांगितले जात आहे.

प्रक्षेपकांना आता पुरस्कर्ते मिळवण्यात प्रश्न येणार आहेत. त्यामुळे यापूर्वी करार करताना दिलेली रक्कम आता देणे अशक्‍य असेल. सर्वच परिस्थिती बदलत आहे. क्रिकेट मंडळांनी हे लक्षात घेण्याची गरज आहे, असे अभ्यासकांचे मत आहे. भारतातील क्रिकेट सामन्याच्या प्रसारणाचे हक्क स्टार स्पोर्टस्‌कडे; तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील सामन्यांचे हक्क सोनीकडे आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News