कोरोना संपल्यावर कॉंग्रेसमध्ये होणार भुकंप ? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 13 May 2020

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कॉंग्रेसचे काही आमदार क्रॉस वोट करणार होते. यावरही पाटील बोलले, राजघराण्यातल्या लोकांना कॉंग्रेसला जपता आले नाही. ते इतरांना काय जपणार अशी टीका सुध्दा त्यांनी कॉंग्रेसवरती केली. 

महाराष्ट्र - सद्या अवघ्या जगावर कोरोनाच संकट आहे, त्यामुळे बरेच राजकीय नेते सोशल मीडियावर येऊन जनतेशी संवाद साधत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना म्हणाले की, कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्र बाहेर आल्यानंतर कॉंग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार आहे.  पाटलांच्या व्यक्तव्यामुळं पुन्हा राजकीय चर्चेला सोशल मीडियावर उधान आल्याचं पाहायला मिळत आहे. 

कोरोना संकट भारतातून गेल्यानंतर देशात तीन मोठे राजकीय भुकंप होतील, तर महाराष्ट्रात असंख्य भुकंप होतील असं पाटील म्हणाल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावरती सुध्दा टीका केली आहे. "थोरात तुम्ही सांभाळा, तुमचा पक्ष जपा" अशा पध्दतीची टीका सुध्दा त्यांनी केली.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कॉंग्रेसचे काही आमदार क्रॉस वोट करणार होते. यावरही पाटील बोलले, राजघराण्यातल्या लोकांना कॉंग्रेसला जपता आले नाही. ते इतरांना काय जपणार अशी टीका सुध्दा त्यांनी कॉंग्रेसवरती केली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News