परीक्षा घेताना विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवणार : उदय सामंत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 17 September 2020
  • अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावरून अनेक राजकीय वाद झाले होते.
  • परंतु त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला की, अंतिम वर्षाच्या परीक्षा या घेतल्याच जाणार असा निर्णय घेतला गेला आहे.

नागपूर :- अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावरून अनेक राजकीय वाद झाले होते. परंतु त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला की, अंतिम वर्षाच्या परीक्षा या घेतल्याच जाणार असा निर्णय घेतला गेला आहे. त्यानुसार सर्व विद्यापीठ परीक्षा घेण्यापूर्वी सर्व तयारी करत आहेत. शासनातर्फे राज्यातील सर्व विद्यापीठांना परीक्षांच्या काळात सहकार्य करण्यासाठी आपण भेटी देत आहोत. परीक्षा घेताना शिक्षक, कर्मचारी यांना परीक्षा घेताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याची शासनाची भूमिका आहे. त्यांना नैतिक पाठिंबा देण्यासाठी विदर्भातील विद्यापठांना भेटी देत आहे. विद्यापीठांच्या स्वायत्ततेवर अतिक्रमण करण्याचा कोणताही विचार नाही, अशी स्पष्ट भूमिका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मांडली.

सामंत यांनी मंगळवारी कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक येथे भेट देत परीक्षेचा आढावा घेतला. यावेळी विद्यापीठाद्वारे सुरू असलेल्या परीक्षेच्या कामाचे कौतुक केले. संस्कृत विद्यापीठाद्वारे १२२५ विद्यार्थी १ ते १३ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देणार आहे. अंतिम वर्षांतील ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देताना अडचणी येतील त्यांची त्या जिल्ह्यातील केंद्रांवर पुन्हा परीक्षा घेण्यात येइल. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता विद्यापीठांनी घ्यावी, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले. याशिवाय विद्यापीठामध्ये मुलींचे वसतिगृह बांधण्यासाठी आवश्यक अशी जागा उपलब्ध करून देत निधीही देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. संस्कृत विद्यापीठातील आढावा बैठकीला आमदार आशिष जयस्वाल, कुलगु प्रो. श्रीनिवास वरखेडी, कुलसचिव प्रो. विजयकुमार उपस्थित होते.

उदय सामंत यांना अभाविप कार्यकर्त्यांची धमकी

उदय सामंत हे अमरावती विद्यापीठाच्या दौऱ्यावर असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाला भेटू न शकल्याने त्यांनी ‘तुम्ही अमरावती कसे सोडता आणि नागपूरला कसे पोहचता ते बघतोच’ अशा शब्दांमध्ये पोलिसांसमोर धमकी दिली. यामुळे अभाविपच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.  शिक्षणमंत्र्यांची ही भेट म्हणजे विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर गदा आणणारी असल्याचा आरोप करण्यात आला. या दौऱ्याचा निषेध म्हणून  मंगळवारी अमरावती विद्यापीठात सामंत येताच अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. याबाबत सामंत  म्हणाले, मी कुणाविरोधातही पोलिसात तक्रार केली नाही. परंतु, संपूर्ण प्रकार पोलिसांसमोरच घडल्याने त्यांनी कारवाई केली असावी. अशाप्रकारे धमकी देणे ही गंभीर बाब आहे.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News