तुला नाही miss करणार...

रसिका जाधव
Thursday, 30 July 2020

खुप काळानंतर

काही क्षण सुखाचे आले

असे वाटले होते की

सारेकाही ठीक झाले

पण ते सारे स्वप्न होते

त्या स्वप्नांत पुन्हा नाही रमणार

रोज तुझी आठवण आली

तु नाही आठवलेस तरी

अजिबात नाही रडणार

पण आता कधीच

तुला नाही miss करणार...

खुप काळानंतर

काही क्षण सुखाचे आले

असे वाटले होते की

सारेकाही ठीक झाले

पण ते सारे स्वप्न होते

त्या स्वप्नांत पुन्हा नाही रमणार

पण आता कधीच

तुला नाही miss करणार...

कधी खुप दुखामुळे

मन मरून जाते

जरासे कुणी प्रेम दिले

भरकटून जाते

पण आता नाही भरकटू देणार

पण आता कधीच

तुला नाही miss करणार...

ज्याला रोज प्रेम मिळते

त्याला वेदना कळत नसते

एकट्या पडलेल्या मनाचे

दुख समजत नसते

झाले कितीही दुख तरी

तुला नाही सांगणार

पण आता कधीच

तुला नाही miss करणार...

तुला खुप miss करणारे असतील

खुप हसवणारे ही असतील

पण मला कुणीच नाही

नसले जरी कुणी आता

खंत नाही करणार

पण आता कधीच

तुला नाही miss करणार...

आता मी तुझ्यापासून

खूप दूर जाणार

तुझ्या आठवणींतच राहीन

पण कधी त्रास नाही देणार

तु खुश राहा आनंदी राहा

मी नाही विसरली तरी

मला विसरून जा

आता आणखी काही नाही फक्त

हे शेवटचेच मागणार

पण आता कधीच

तुला नाही miss करणार..

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News