जेईई मेन परीक्षा पुन्हा होणार? उच्च न्यायालयाचा महत्त्वपुर्ण निर्णय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 1 September 2020
  • विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही अशी ग्वाही नागपूर खंडपीठाने दिली.

नागपूर : नैसर्गिक कारणांमुळे जे विद्यार्थी जेईई मेन परीक्षेला बसू शकले नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. नागपूर खंडपीठाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश दिले. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही अशी ग्वाही नागपूर खंडपीठाने दिली.

विदर्भामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली, अनेक गावांचा संपर्क तुटला, दळवळ व्यवस्था कोलमंडली त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाने शक्य झाले नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी नागपूर खंडपीठात धाव घेतली. आणि कोर्टात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाल यांच्या बॅंच समोर युक्तिवाद झाला. न्यायाधीशांनी या प्रकरणी तात्काळ दखल घेऊन सुनावणी जाहीर केली. 

काय म्हणाले न्यायधीश

पूर परिस्थिती आणि परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी सार्वजणिक दळवळनाची व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचू शकले नाही. यात विद्यार्थ्यांची कोणतीही चूक नाही. जे विद्यार्थ्यींनी परीक्षा केंद्रावर पोहचू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी परीक्षा कॉर्डिनेटरद्वारे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे पुन्हा परीक्षा घेण्यासाठी अर्ज करावा. नॅशनल टेस्टिंग एजन्सी 15 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून यावर निर्णय घेईल असा आदेश न्यायधीशांनी बजावला.

काय म्हणाले मंत्री

विदर्भात पूरपरिस्थिती निर्माण झाली, अनेक गावांचा संपर्क तुटला, रस्ते जलमय झाले, पुलावरून पाणी वाहत आहे, अशा परिस्थितीत नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अकोला, अमरावती या परीक्षा केंद्रावर विद्यार्थी पोहोचू शकले नाही. त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सावंत यांनी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशी संपर्क साधून राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News