ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थांना सरकार वाटणार मोफत लॅपटॉप? जाणून घ्या सत्य

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 14 September 2020
  • कोरोनामुळे मार्चपासून शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत. परंतु विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यावर पर्याय मार्ग म्हणून विद्यार्थांना ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे.
  • परंतु काही विद्यर्थांना त्यांचा फायदा घेता येत नाही कारण त्या विद्यार्थांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध नाहीत.

नवी दिल्ली :- कोरोनामुळे मार्चपासून शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत. परंतु विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यावर पर्याय मार्ग म्हणून विद्यार्थांना ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. परंतु काही विद्यर्थांना त्यांचा फायदा घेता येत नाही कारण त्या विद्यार्थांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध नाहीत. सध्या सोशल मिडियावर एक बातमी वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा करण्यात येत आहे की, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय विद्यार्थ्यांना ३५०० रुपयात लॅपटॉप देत आहेत. या व्हायरल झालेल्या बातमीच्या मते, एमसीए कोव्हिड-१९ ऑनलाइन शिक्षण अंतर्गत ८ वी पासून पीयूसी १ च्या विद्यार्थ्यांना ३५०० रुपयात लॅपटॉप देत आहे. या खोट्या दाव्याची चौकशी जेव्हा पीआयबीने केली, तेव्हा याबाबत सत्य उघडकीस आले. पीआयबीने हा दावा फेक ठरवला आहे.

काय आहे सत्य?

भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडल पीआयबी फॅक्ट चेकने ही, जाहिरात खोटी ठरवली आहे. पीआयबी फॅक्ट चेकने असे म्हटले आहे की, एमसीए कोव्हिड-१९  ऑनलाइन एज्यूकेशन उद्देश्य या करता लॅपटॉप प्रदान करत नाही आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही बातमी खोटी आहे.

 

 

व्हायरल जाहिरातीमध्ये असे सांगण्यात आले आहे की, ३५०० रुपयात लॅपटॉप खरेदी करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर आहे. अर्ज केल्यानंतर ३०  दिवसात लॅपटॉप मिळेल. हे लॅपटॉप लावा, लेनोव्हो आणि एटीएस कंपनीचे असणार आहेत. ज्यामध्ये Windows 10 OS, Intel Atom Processor, 32GB HDD Storage, ATS, 2GB रॅम असेल.

या खोटारड्या जाहिरातीनुसार, लॅपटॉपसाठी अर्ज करण्यासाठी काही कागदपत्रे देखील गरजेची आहेत. आधार कार्ड, फोटो, विद्यार्थ्याचे आयडी कार्ड, पालकांचे आधार कार्ड, शिक्षकांचे नाव आणि संपर्क क्रमांक द्यावा लागेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News