'या' कारणामुळे Google पुन्हा ban करणार का Paytm App?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 29 September 2020
  • आता सर्वच लोक पेटीएमचा वापर करत असतात.
  • परंतु काही दिवसांपूर्वी Google Play store वरून पेटीएम अॅप अचानक गायब झाले होते.

नवी दिल्ली :- आता सर्वच लोक पेटीएमचा वापर करत असतात. परंतु काही दिवसांपूर्वी Google Play store वरून पेटीएम अॅप अचानक गायब झाले होते. गुगलने काही नियमांचा भंग केला म्हणून या अॅपवर बंदी घातली होती. आता पुन्हा तसेच होणार का?

आपल्यापैकी अनेकांच्या मोबाईलमध्ये असलेलं पेटीएम अॅप काही दिवसांपूर्वी वादात अडकले होते. गुगल भारताने पेटीएम अॅप प्ले स्टोअरवरून काढून टाकले होते. पेटीएम अॅपने गुगलच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप गुगलने केला होता. अॅप डेव्हलपर्ससाठी घालून देण्यात आलेल्या नियमांपैकी गॅम्बलिंग गाइडलाइन्सचे पेटीएम ने उल्लंघन केले असा आरोप या अॅपवर झाला होता. आता पेटीएमने पुन्हा एकदा आयपीलसाठी खास तयार केलेली कॅशबॅक स्कीम आणली आहे. आता ही गुगलच्या नियमात बसणारी नसेल तर पुन्हा या अॅपवर बंदी येणार का असा प्रश्न आहे.

काही दिवसांपूर्वी पेटीएम अॅप गुगल प्ले स्टोअरवरून अचानक गायब झाल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. पण गुगलने पेटीएम अॅप नक्की कशामुळे प्ले स्टोअरवरून काढून टाकले होते, याचे कारण आता समोर आले आहे.

अॅप डेव्हलरर्सना गुगलने काही नियम घालून दिलेले असतात त्या अटी आणि नियमांमध्ये राहूनच अॅप्समध्ये बदल करणे अपेक्षित असते. काही दिवसांपूर्वी पेटीएमने आयपीएलशी संबंधित एक 'कॅशबॅक स्किम' आपल्या युझर्ससाठी आणली होती. परंतु या स्कीममुळे गुगलने घालून दिलेल्या गॅम्बलिंग गाईडलानन्सचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत हे अॅप प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आले होते.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News