'हे' गिफ्ट आयुष्य वाढवणार

कविता व्यवहारे, सातारा
Wednesday, 5 June 2019

मला माझ्या मैत्रिणीनं माझ्या वाढदिवसाला दिलेली प्रेमाची भेट! किती आश्चर्य वाटलेलं मला तिच्या वागण्याचं पण आता कौतुक वाटतय तिच्या प्रेमळ भेटीचं. भेट ही भेटच असते तिला पैशात नाही तोलता येत तेच झालं माझं ती कळी पाहून

सकाळी लवकर उठण्याचा बेत आखूनच मी रात्री झोपी गेले, पण का कुणास ठाऊक झोप पूर्ण झाल्यासारखी वाटली नाही. सकाळी उशिराच उठले. उठल्यानंतर अंगणात फेरफटका मारताना जाणवले मी लावलेल्या गुलाबाच्या रोपट्याला नाजुकशी कळी आलेली आहे. थोडयाच वेळात त्या कळीचे फुलात रूपांतर होइल या आशेने मी त्या रोपाकडे एकटक बघत राहिले पण निसर्ग तो फारचं लबाड त्याने मला हुलकावणी दिली आणि थेट दुसऱ्या दिवशी गुलाबाची कळी खुलली, ते फुल पाहून किती आनंद झाला म्हणून सांगू? बघता बघता ह्या गोष्टीला दीड महिना उलटून गेला पण तो निखळ आनंद मी कधीही विसरू शकत नाही. 
           
मी नेहमी ऐकायचे निसर्गाची किमया न्यारीच आहे पण त्या दिवशी प्रत्यक्ष अनुभव घेतला. शिशीरात पानगळती, वसंतात नवी पालवी सारच किती लोभस किती निरागस. काही गोष्टींचे वर्णन करताना शब्द सुचत नाहीत आपण निशब्द होतो अगदी तसं झालं आहे माझं. मला आनंद होण्यामागचं कारण फक्त त्या कळीच फुलात रूपांतर नव्हतं तर ते माझ्या मैत्रीचं प्रतिक होतं. 

मला माझ्या मैत्रिणीनं माझ्या वाढदिवसाला दिलेली प्रेमाची भेट! किती आश्चर्य वाटलेलं मला तिच्या वागण्याचं पण आता कौतुक वाटतय तिच्या प्रेमळ भेटीचं. भेट ही भेटच असते तिला पैशात नाही तोलता येत तेच झालं माझं ती कळी पाहून. आपण आपल्या माणसाकडून किती अपेक्षा करत असतो पण निसर्ग कधीच आपली मर्यादा सोडत नाही. सतत देणं हेच त्याचं परम कर्तव्य. तो देतानाही हा विचार करत नाही, 'हा श्रीमंत, तो गरीब प्रत्येकाला सारखाच आनंद देणं हीच त्याची किमया.'
            
मी ठरवलय मीही निसर्गाला भरभरून देणार. पर्यावरण वृद्धीसाठी प्रयत्न करणार, मी तर झाड लावणारच त्याचबरोबर त्यांची देखभाल करणार. माझ्या मैत्रिणीप्रमाणे मीही वाढदिवशी रोप भेट देणार, पर्यावरण रक्षणासाठी भाषणबाजी करण्यापेक्षा मी स्वतः कृती करणार ह्या सगळ्या माझ्या उपक्रमामध्ये माझ्या मैत्रिणीनाही सहभागी करणार, निसर्गाप्रमाणे मला देता आले नाही तरी चालेल पण मी निसर्गाला ओरबडणार नाही. निसर्ग टवटवीत राहिला तरच तो आपल्याला टवटवी देईल.
            
निसर्ग हा असाच टवटवीत रहावा हीच माझी मनापासून इच्छा आहे. तेव्हा चला  ठरवूया, पर्यावरण रक्षण करूया, वृक्षराजी वाढवूया आनंदाने नाचूया!!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News