या महिन्यानंतर भारतात क्रिकेट सामने सुरु होणार?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 15 June 2020
  • कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना एक आशेचा किरण  

मुंबई : भारतात पुन्हा क्रिकेट सुरू करण्याचा विचार केला जात असला, तरी ऑक्‍टोबरपर्यंत क्रिकेट सुरक्षित नाहीच, असे मत माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केले. जैव सुरक्षा वातावरण निर्माण करून लंडनमध्ये इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिका सुरू होणार आहे, हे एक चांगले सुचिन्ह आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना हा एक आशेचा किरण आहे, असे गावसकर यांनी म्हटले आहे.

डॉक्‍टर्स जे काही सांगत आहेत, त्यानुसार आपण एकमेकांमध्ये अंतर ठेवून रहात आहोत, इतरही उपाययोजना करत आहोत; परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबताना दिसत नाही, अशी खंत गावसकर यांनी व्यक्त केली.

कोरोना चाचण्या वाढवल्या जात आहेत, तशी बाधित रुग्णांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे कमीत कमी पुढील दोन महिने तरी, कदाचित ऑक्‍टोबरपर्यंत, आपल्या देशात क्रिकेट पुन्हा सुरू होणे कठीण आहे, असे मत गावसकर यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणतात, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात पुढील महिन्यात सुरू होणारी कसोटी मालिका सर्वांसाठी महत्त्वाची असेल. त्याचबरोबर आपण क्रिकेट सुरू करावे की नाही, याबाबतही दिशा देणारी असेल. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झालेला असून सध्या ते दोन आठवड्यांच्या विलगीकरणात आहेत. त्यानंतर त्यांचा सराव सुरू होईल. 8 जुलैपासून पहिला कसोटी सामना सुरू होईल. प्रेक्षकांविना ही मालिका होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News