स्वातंत्र्यदिनी कोरोनाची लस उपलब्ध होणार ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 4 July 2020

मानवी चाचणीनंतर 15 ऑगस्टपर्यंत "भारत बायोटेक' आयसीएमआरकडून ही लस उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई : भारतात कोरोना व्हायरसचे थैमान सुरू असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. 15 ऑगस्टपर्यंत कोरोनाची लस येण्याची शक्‍यता असल्याचे सांगितले जात आहे. देशात कोरोनाचे 20 हजारांच्या आसपास रुग्ण दरदिवशी वाढत असल्याने चिंता व्यक्त होत असतानाच आता ही दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशात आणखी एका लसीला मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. देशात पाच दिवसांच्या आत क्‍लिनिकल वापरासाठी शासनाकडून ही मंजुरी मिळालेली दुसरी लस असल्याची माहिती मिळाली आहे.

कोवॅक्‍सिन (COVAXIN) असे या लसीचे नाव असू शकेल, असेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ही लस कसे काम करणार हे सात जुलैला पहिल्या मानवी चाचणीनंतर कळू शकणार आहे. जगात आतापर्यंत कोरोनावर 125 हून अधिक वॅक्‍सीनवर काम सुरू आहे. त्यापैकी भारतात दोन लसींना मानवी चाचणीसाठी परवानगी मिळाली आहे. मानवी चाचणीनंतर 15 ऑगस्टपर्यंत "भारत बायोटेक' आयसीएमआरकडून ही लस भारतात उपलब्ध केली जाऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे. ही लस 15 ऑगस्टपर्यंत उपलब्ध झाली तर भारत पहिला देश असेल, ज्याकडे कोरोनावर उपचार करणारी लस असेल.

अशी तयार झाली भारतीय लस

आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) आणि भारत बायोटेक (बीबीआयएल)ने मिळून कोवॅक्‍सीन लस विकसित केली आहे. ही लस तयार करण्यासाठी एनआयव्हीने कोरोनाची लागण झालेल्या; पण कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णाच्या शरीरातून कोरोना विषाणूचा स्ट्रेन वेगळा काढला. त्यानंतर हा स्ट्रेन बीबीआयएलला पाठवण्यात आला. बीबीआयएलने त्या स्ट्रेनपासून एक निष्क्रिय लस तयार केली. त्याचबरोबर रुग्णांवर या औषधाचा परिणाम होऊ नये म्हणून हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -3 हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्येही मृत व्हायरसपासून ही लस विकसित करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने निष्क्रिय लसीचा आतापर्यंतचा सकारात्मक परिनाम दिसून आला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News