एमबीए आणि पीजीडीएम दोन्ही अभ्यासक्रम बंद होणार?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020

पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविका हे दोन्ही अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून एकाच महाविद्यालयात चालवणे बंद होणार आहेत

नवी दिल्ली: पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविका हे दोन्ही अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून एकाच महाविद्यालयात चालवणे बंद होणार आहेत, असा आदेश अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने काढला. त्यामुळे एमबीए पदव्युत्तर पदवी आणि पीजीडीएम पदविका अशा दोन्ही अभ्यासक्रमाला एकाच महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही. राज्यातल्या 35 महाविद्यालयात दोन्ही अभ्यासक्रम शिकवले जातात. या महाविद्यालयांना आता दोन्ही पैकी एक अभ्यासक्रम बंद करावा लागणार आहे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने एक अहवाल सादर केला, त्यानुसार देशातील 164 शिक्षण संस्थेमध्ये दोन्ही अभ्यासक्रम सुरु असल्याचे म्हटले आहे. भारतीय व्यवस्थापन संस्थेप्रमाणे (IIM) राज्यातील काही अभिमत विद्यापीठे, खासगी शिक्षण संस्थांना व्यवस्थापन (एमबीए) अभ्यासक्रम चालविण्याचे अधिकार दिले होते. मात्र अशा शिक्षण संस्थांनी व्यवस्थापणाच्या नावाखाली पदविव्युत्तर पदविका (PHDM) अभ्यासक्रम सुरु केले. हे अभ्यासक्रम पुर्ण वेळ नाहीत, अभ्यासक्रमांना परिषदेची मान्यता नाही त्यामुळे तंत्रशिक्षण परिषदेने आक्षेप नोंदवला आहे. एकाचं शिक्षण संस्थेत दोन्ही अभ्यासक्रम चावविले जात असतील तर एक अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय परीषदेचे सचिव राजीव कुमार यांनी घेतल. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार विद्यापीठांना देण्यात आले आहेत.   

ज्या शिक्षण संस्थांना एमबीए आणि पीएमडीएम दोन्ही अभ्यासक्रम सुरु करायचे असतील त्यांनी नविन शिक्षण संस्था सुरु करावी आणि तंत्रशिक्षण परीषदेची मान्यता घ्यावी, त्यानंतर दोन्ही अभ्यासक्रम सुरु करता येतील. दरवर्षी अभियांत्रिकी महाविद्यायांच्या अनेक जागा रिक्त राहतात. त्यामुळे नविन अभियांत्रिकी महाविद्यालयांना परवाणगी नाकारली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News