पडळकरांना चोप देणार; राष्ट्रवादी आक्रमक 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 24 June 2020

ठाणे, बीड आणि अन्य ठिकाणी पडळकरांचे बॅनर जाळले, तसेच माफी जाहीर मागितली नाहीतर तोंड काळं करून त्यांना चोप देण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला. 

महाराष्ट्र - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बेताल व्यक्तव्य केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पडळकरांनी जाहीर माफी मागितली नाही, तर तोंडाळा काळे फासून चोप देणार असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. पडकरांच्या विधानाने आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन केले. 

पंढरपूरात पत्रकारांशी संवाद साधत असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याचं वक्तव्य केलं होतं. याकारणामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक झाली असून राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी झापलं आहे. तसेच भाजपची परंपरा जपण्याचा प्रयत्न करत असल्याचं सुध्दा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटलं आहे.  शरद पवारांची माफी नाही मागितली तर पडळकरांचं तोंड काळं करून त्यांना चोप देण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी दिला. 

पडळकर यांचं वक्तव्य निंदणीय आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांना राजकारणातले गुरू मानतात त्या नेत्यावर टिका करणं हे बालिशपणाचं लक्षण आहे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी लगावला. 

ठाणे, बीड आणि अन्य ठिकाणी पडळकरांचे बॅनर जाळले, तसेच माफी जाहीर मागितली नाहीतर तोंड काळं करून त्यांना चोप देण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News